scorecardresearch

साथीच्या काळात गुंतवणुकीच्या कोणत्या सुरक्षित पर्यायांचा विचार करता येईल?

साथीच्या काळातदेखील स्थिर मोबदला देऊ शकतील असे गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत.

यानंतर क्रिकेट सामने बंद असल्यामुळे अनेक क्रिकेट बोर्डांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

– अनमोल गुप्‍ता

वणव्याप्रमाणे जगभर पसरलेल्या नोव्हेल कोरोनाविषाणूच्या साथीने आर्थिक व्यवहार आजवर कधी झाले नव्हते एवढे उद्ध्वस्त करून टाकले आहेत. गुंतवणूक अॅसेट्सचे मूल्य सर्वत्र कमी झाले आहे. कारण, अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत आणि खरेदीदारांचा रस संपत चालला आहे. शेअर बाजारात विक्रीचा धडाका आणि अन्य असेट वर्गांमध्ये रोखतेची चणचण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारची अनिश्चिततेची भावना आली आहे. तरीही या साथीच्या काळातदेखील स्थिर मोबदला देऊ शकतील असे गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत.अर्थात हे करताना खबरदारीही घेतली पाहिजे!

कोविडपूर्व काळात निश्चित झालेल्या निकषांच्या आधारे या गुंतवणूक पर्यायांचे विश्लेषण करणे योग्य ठरणार नाही. उद्दिष्टामध्ये बदल होऊन ती उच्च मोबदल्यावरून सुरक्षितता व मुद्दल संरक्षणावर आली आहेत. यात काही तडजोडी करण्याची आवश्यकता भासणार आहे. उदाहरणार्थ, दीर्घ मुदत, कमी मोबदला व कमी रोखता. निश्चित मोबदला देणाऱ्या गुंतवणुकी, डेट इन्स्ट्रुमेंट्स आणि सोने हे आदर्श पर्याय ठरू शकतात. डेट मार्केट्स तुलनेने स्थिर समजली जात होती. त्यामुळे डेट फंड पूर्णपणे सुरक्षित अशी भावना निर्माण झाली. एका मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनीने सहा डेट फंड्स बंद केल्यामुळे मात्र बाजारात भयकंप पसरला. मूलभूत असेट्सचा दर्जा लक्षात घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

सरकारी कर्ज किंवा सरकारशी निगडित यंत्रणांचे कर्ज मूलभूत असेट म्हणून धरून ठेवणाऱ्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला उपयुक्त ठरेल. भारत बॉण्ड फंड ऑफ फंड्स हा एक पॅसिव फंड असून यामध्ये केवळ एएए-मानांकित पीएसयू रोखे ठेवले जातात. हा तुलनेने सुरक्षित पर्याय आहे पण त्यातील लक्षात घेण्‍याजोगी बाब अशी आहे की, तुम्हाला दीर्घकालीन कक्षेत गुंतवणूक करावी लागते. लघुकालीन गुंतवणूक कक्षेसाठी गुंतवणूकदार अन्य डेट फंडांचा विचार करू शकतात. यामध्ये सरकारी सिक्युरिटीज किंवा फंड्स असतात आणि त्यांचे मूलभूत असेट्स बँक किंवा पीएसयू रोखे असतात. विविधीकरणाचे महत्त्व या संकटात अनेक पटींनी वाढले आहे. विविधीकरण तसेच मुद्दल संरक्षणासाठी बँकेतील मुदत ठेवी हा पर्यायही उत्तम ठरू शकतो.

यातून मिळणारा मोबदला कमी असतो पण रोखता पर्याप्त असते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे बँक मुदत ठेवी ही सुलभ उत्पादने आहेत आणि भारतातील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. अनिश्चिततेच्या काळात एक सुरक्षित असेट म्हणून सोन्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे सर्वज्ञात आहे, ते स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. सोन्याचा बहुतेक वित्तीय असेट्सशी, विशेषत: शेअर बाजारांशी, व्यस्त संबंध (रिव्हर्स कोरिलेशन) आहे. त्यामुळे मुद्दल संरक्षणासाठी सोनेखरेदी हा आदर्श पर्याय आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक चढउतार झाले आहेत पण हे संकट दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता असल्याने भांडवल मूल्यवर्धनाची अपेक्षा केली जाऊ शकते. सोन्याची खरेदी सोने हस्तांतर-व्यापार फंडांच्या, स्वायत्त सुवर्ण रोख्यांच्या तसेच डिजिटल सुवर्णाच्या माध्यमातून ऑनलाइन केली जाऊ शकते.  शेअर बाजारांमध्ये काही काळ चढउतार होत राहणे अपेक्षितच आहे.

जर तुमची जोखीम पत्करण्याची तयारी असेल आणि २-३ वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवण्याकरता तुमच्याकडे अतिरिक्त निधी असेल तर तुम्ही या निधीचा काही भाग मूलभूतरित्‍या भक्कम असलेल्या कंपन्यांच्या समभागांत गुंतवण्‍याचा विचार करू शकता. दरांच्या दररोजच्या हालचालींकडे बघणे मात्र टाळले पाहिजे. तुम्ही स्वत: बाजारात सक्रिय नसाल, तर अशा प्रकारच्या गुंतवणुकींचा निर्णय तुमच्या गुंतवणूक सल्लादाराशी चर्चा करूनच घेतला पाहिजे.  गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये निधीचे वितरण करताना आपल्या हातात पुरेसा रोख पैसा राहील याची काळजी घेणेही शहाणपणाचे ठरेल, कारण या साथीचा नेमका परिणाम काय होईल, हे अद्याप अज्ञातच आहे.

 ( लेखक चीफ ट्रेझरी ऑफिसर, आधार हाउसिंग फायनान्स आहेत.)

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Given the uncertainties in the market what are safe form of investments one can explore nck