मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढताना दिसत आहेत. MCX वर, सोने ऑक्टोबरमध्ये १७७ रुपयांच्या वाढीसह ४६,०६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. दरम्यान, चांदीचा सप्टेंबर वायदा ४७८ किंवा ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६३,११५  रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसला.काल, एमसीएक्स वर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने ६३९ रुपये अर्थात  १.३७ टक्क्यांनी घसरून ४६,३११ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी १,३१७ म्हणजे २.०३ टक्क्यांनी कमी होऊन ६४,७१० रुपये किलो झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचे दर काही महिन्यांतील सगळ्यात खालच्या पातळीवर होते. याच कारण म्हणजे अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ आणि डॉलरला आलेली बळकटी आहे. डॉलर निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर स्थिर राहिल्याने इतर चलनांच्या धारकांसाठी सोने अधिक महाग झाले. दुसरीकडे, स्पॉट गोल्ड १,७३०.४७ डॉलर प्रति औंस किरकोळ कमी झाले तर  यूएस गोल्ड फ्युचर्स ०.४% वाढून १,७३२.९० डॉलर प्रति औंस झाले. कामगार बाजारात सुधारणेची चिन्हे दिसू लागली. त्याच वेळी, यूएस ट्रेझरी उत्पन्न तीन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांपर्यंत पोहोचले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate on 10 august 2021 price forecast outlook silver price today ttg
First published on: 10-08-2021 at 12:38 IST