सोन्या चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसात चढउतार पाहायला मिळत आहे. करोना महामारी, महागाई, रशिया-युक्रेय यांच्या युद्धजन्य स्थिती याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सोन्याची किंमत ५० हजारांच्या पार गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात ०.०१ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर चांदीच्या किंमतीत ०.३८ टक्क्यांची घट दिसून आली आहे. एप्रिल डिलिव्हरी असलेल्या सोन्याची किंमत ०.०१ टक्क्यांच्या तेजीसह ५०,११९ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीची किंमत ०.३८ टक्क्यांच्या घसरणीसह ६३,६५९ रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१८० रुपये इतका असेल.

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.