देशातील बँकप्रमुखांची बैठक पुन्हा एकदा होणार आहे. गेल्याच आठवडय़ात बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता- ‘एनपीए’बाबत झालेल्या चर्चेनंतर यंदाची फेरी ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारकडून भांडवल ओतण्याच्या मुद्दय़ासाठी असेल. येत्या आठवडात ही बैठक नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. अशीच एक बैठक मुंबईतही होण्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवडय़ात झालेल्या बँकांच्या प्रमुखांबरोबर चर्चेदरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकांना त्यांचे व्याजदर कमी करण्याची सूचना करताना, त्यांना पुरेसे भांडवल पुरविण्याची ग्वाही दिली होती. तथापि बँकांनी आता कर्जदारांवरील ओझे कमी करावे, अशी अपेक्षा बँकप्रमुखांसमोर त्यांनी व्यक्त केली होती.
वाढत्या ‘एनपीए’चा सामना करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भाडंवली स्फुरण देण्याच्या विषयावर येत्या आठवडय़ात बँकप्रमुखांशी अर्थमंत्री चर्चा करतील. चालू आर्थिक वर्षांसाठीच्या अर्थसंकल्पात या संबंधाने ८,००० कोटी रुपयांची करण्यात आली आहे. ती अपुरी असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केले, तर त्यात वाढीच्या मागणीत तथ्य असल्याची कबुली खुद्द जेटली यांनीही दिली आहे.