चालू आíथक वर्षांच्याच्या पहिल्या तिमाहीत १० टक्के विक्रीत वाढ नोंदवत हीरो मोटोकॉर्प या सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीने जुल महिन्यातील अधिक विक्रीची आघाडी कायम ठेवली आहे. हीरो मोटोकॉर्पने जुलमध्ये ५,२९,८६२ दुचाकींची रवानगी केली असून गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही ९ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने ४,८७,५४५ दुचाकींची विक्री केली होती. 

पहिल्या तिमाहीत कंपनीने सर्वाधिक असा तिमाही विक्री उच्चांक गाठला असून या तिमाहीत कंपनीने १७,१५,१२९ दुचाकींची विक्री केली आहे. ही वाढ १० टक्क्यांची असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनी ने १५,५९,२८२ वाहनांची विक्री केली होती. जुलमध्ये कंपनीतर्फे कोलंबिया येथे त्यांची उपकंपनी -एचसीएमएल कोलंबिया एसएएस’ची स्थापना करण्यात येत असून हीरोने कोलंबियामध्ये अत्याधुनिक अशा उत्पादन केंद्राचे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे हिरो मोटोकॉर्प ही लॅटिन अमेरिकेत आपले उत्पादन केंद्र सुरू करणारी पहिली भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी ठरली.