‘आयडिया सेल्युलर’चा आगामी २जी लिलावात सहभाग निश्चित

सरकारने प्रस्तावित केलेल्या आगामी २जी ध्वनिलहरींच्या लिलावात आयडिया सेल्युलरचे ९०० मेगाहर्ट्झ आणि १८०० मेगाहर्ट्झ दोन्ही लहरींच्या पट्टय़ात स्वारस्य असून,

सरकारने प्रस्तावित केलेल्या आगामी २जी ध्वनिलहरींच्या लिलावात आयडिया सेल्युलरचे ९०० मेगाहर्ट्झ आणि १८०० मेगाहर्ट्झ दोन्ही लहरींच्या पट्टय़ात स्वारस्य असून, मुदत संपुष्टात येणाऱ्या नऊ परिमंडळांतील परवान्यांच्या नूतनीकरणासाठी बोली लावण्याचा मानस कंपनीने स्पष्ट केला आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा प्रदाता असलेल्या आयडियाने कार्यक्षेत्रातील व्याप्तीच्या जोरावर सरलेल्या जून-सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६९ टक्के वाढ नोंदविणारी कामगिरी केली. कंपनीच्या आर्थिक कामगिरीची माहिती देताना, व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया यांनी नव्या लिलाव प्रक्रियेत सहभाग मानस स्पष्ट केला. आयडिया ज्या ध्वनिलहरींसाठी बोली लावण्यास उत्सुक आहे, त्यांची आधार किंमत १०,००० कोटी रुपयांपासून सुरू होते, अशी पुस्तीही कपानिया यांनी जोडली. तरी आदित्य बिर्ला समूहातील या कंपनीला लिलाव प्रक्रियेसाठी अतिरिक्त भांडवल उभारण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट कंपनीवरील कर्जदायित्व उत्तरोत्तर कमी करून ताळेबंदावरील नक्त कर्जबोझा हलका करण्याकडे कल असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Idea to participate in upcoming 2g spectrum auction

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या