वस्तू व सेवा कराबाबत महत्त्वाच्या बाबी

जीएसटीची अंमलबजावणी म्हणजे फक्त करमधील बदल नाही.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

 

जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर आकारत असलेल्या आकारणीमधील एकूण बदल होय. सध्या उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारला जाते. वस्तूंची देवाणघेवाण होताच मूल्यवर्धित कर आकारला जातो आणि उत्पादनाचे मूल्य वाढते. राज्यांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते तेव्हा सीएसटी (केंद्रीय विक्री कर) आकारला जातो. अशा पद्धतीने उत्पादनाच्या मूल्यामध्ये उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर, सीएटी यांची भर करत उत्पादन अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवले जाते. विविध पातळींवरील करांना आता जीएसटीमध्ये येणार आहे.

सरकार येत्या १ जुलैपासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू करण्याची तयारी करत आहे. हा कर अप्रत्यक्ष करांच्या आकारणीच्या संकल्पनेमध्ये बदल घडवून आणेल. व्यवसायांना ही आकारणी समजणे आणि त्यांना ही आकारणी लागू पडते की नाही, हे ओळखणे महत्वाचे आहे.

तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर निष्टिद्धr(१५५)तच तुम्ही प्राप्तीकर व्यतिरिक्त इतर कर भरत असाल – मग तो कर सेवा कर, उत्पादन शुल्क, मूल्यवर्धिक तर असेल किंवा सीमा शुल्क असेल. या करांना अप्रत्यक्ष कर म्हणतात. जवळपास या करांची जागा आता जीएसटी घेणार आहे.

मात्र जीएसटीची अंमलबजावणी म्हणजे फक्त करमधील बदल नाही. जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर आकारत असलेल्या ‘आकारणी’मधील एकूण बदल होय. सध्या उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारला जाते. वस्तूंची देवाणघेवाण होताच मूल्यवर्धित कर आकारला जातो आणि उत्पादनाचे मूल्य वाढते. राज्यांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते तेव्हा सीएसटी (केंद्रीय विक्री कर) आकारला जातो. अशा पद्धतीने उत्पादनाच्या मूल्यामध्ये उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर, सीएटी यांची भर करत उत्पादन अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवले जाते. या प्रत्येकाचा कर आकारणीचा ‘टप्पा’ वेगवेगळा आहे. या विविध पातळींवरील करांना आता जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

जीएसटी केव्हा आकारला जातो?

जीएसटीबाबत सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे त्याचा आकारणीचा टप्पा. जीएसटी अंतर्गत कर आकारणीचा टप्पा ‘पुरवठा’ आहे. जीएसटी कायद्यामध्ये पुरवठय़ाचा अर्थ काय आहे? पुरवठा म्हणजे वस्तू व सेवांची विक्री. वस्तू व सेवांचा पुरवठा प्रत्यक्ष विक्रीशिवाय सुद्धा होऊ शकतो. पुरवठय़ामध्ये हस्तांतरण, विनिमय, वस्तूविनिमय, भाडे, भाडेपट्टी आणि एजंट किंवा शाखेला करण्यात आलेला पुरवठा यांचा देखील समावेश असेल. म्हणून जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि वरीलपैकी कशामध्येही समाविष्ट असाल तर तुम्ही खरेदीवर भरलेल्या सर्व करांच्या जागी जीएसटी आकारण्यात येईल आणि तुमच्या पुरवठय़ावर जीएसटी आकारण्यात येईल. या संदर्भात सरकार काही सेवा व वस्तूंची नोंद करू शकतात. जे पुरवठा म्हणून धरले जाणार नाहीत आणि म्हणून त्यावर जीएसटी आकारण्यात येणार नाही. म्हणून पहिली पायरी तुमच्या व्यवसायाने पुरवठा केला आहे की नाही हे ओळखण्याची आहे.

जीएसटीचे काय प्रकार आहेत?

तुमच्या व्यवसायाने पुरवठा केला आहे हे निष्टिद्धr(१५५)त केल्यानंतर पुढील पायरी पुरवठा राज्यांतर्गत किंवा दोन राज्यांमध्ये झाला आहे का हे शोधण्याची आहे. जर मूळ राज्य हे अंतिम राज्यापासून वेगळे असेल तर ते दोन राज्यांमधील पुरवठा मानले जाते. याच कारणामुळे जीएसटीला गंतव्य—आधारित कर म्हटले जाते. दोन राज्यांमध्ये पुरवठा करणाऱ्या व्यवसायाला जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य आहे. बहुतेक पुरवठय़ांवर गंतव्य राज्याच्या दराप्रमाणे कर आकारण्यात येतो. भारताबाहेर करण्यात आलेल्या पुरवठय़ावर कोणताही जीएसटी आकारण्यात येणार नाही; पण अशा पुरवठय़ांसाठी जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. राज्यांतर्गत विक्रीवर केंद्रीय व राज्य कर म्हणजेच एसजीएसटी व सीजीएसटी आकारण्यात येईल. दोन राज्यांमधील विक्रीवर आयजीएसटी आकारण्यात येईल जे सीजीएसटी व एसजीएसटी यांचे एकूण मूल्य असेल. आयातींवर सुद्धा आयजीएसटी आकारण्यात येईल.

जीएसटीसाठी कोणी सज्ज असावे?

जर तुम्ही मूल्यवर्धित कर किंवा सेवा कर किंवा उत्पादन शुल्क अंतर्गत विद्यमान नोंदणीदार असाल तर तुम्ही जीएसटीसाठी नोंदणी करून घेतली पाहिजे. २० लाख रुपयांपेक्षा (ईशान्येकडील राज्यांसाठी १० लाख रुपये) कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांना जीएसटीसाठी नोंदणी करणे अनिवार्य नाही. जर व्यवसाय दोन राज्यांमधील व्यवहारांमध्ये समाविष्ट असेल तर ही मर्यादा गृहित धरू नये. त्याकरिता जीएसटी नोंदणी अनिवार्य आहे.

जर तुमच्या वस्तू व सेवांचा पुरवठा वेबसाइटच्या माध्यमातून होत असेल तर त्यासाठी जीएसटी नोंदणी अनिवार्य असेल. जीएसटी ‘इनपुट सेवा वितरक’करिता सुद्धा लागू आहे. इनपुट सेवा वितरक म्हणजे मुख्य कार्यालय जेथे शाखांना प्राप्त झालेल्या सेवांसाठी बिल प्राप्त होते आणि त्यानंतर शाखांना हिस्सा दिला जातो. अशाप्रकारच्या आयएसडीचीसुद्धा जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

विविध व्यवसायांसाठी जीएसटीची व्यवहार्यता काय आहे?

एक व्यावसायिक म्हणून तुम्ही मूल्यवर्धित करअंतर्गत नोंदणीकृत असाल तरी जीएसटीसाठी नोंदणी केलीच पाहिजे. जीएसटी तुम्ही केलेल्या पुरवठय़ावर जीएसटी देयकासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कर माफ करण्याची सुविधा देईल. उत्पादकसुद्धा नोंदणी करण्याद्वारे लाभ प्राप्त करू शकतात. जेथे ते आता आऊटपुट्सवरील जीएसटीविरोधात इनपुट्सवर भरलेले कर समायोजित करू शकतात. आतापर्यंत सेवा प्रदाते चिंतित आहेत. अनेक विद्यमान नियम जीएसटीमध्ये समाविष्ट होणार आहेत. पण सेवांवरील जीएसटी राज्य व केंद्र या दोन्हीसाठी आकारण्यात येईल. उपभोक्ताच्या ठिकाणी कर आकारण्यात येईल आणि उपभोक्ता राज्याला ते प्राप्त होईल. सेवा प्रदाते इनपुट वस्तूवर आकारण्यात आलेले कर माफ करण्याचा दावा करू शकतील. जे पूर्वी फक्त इनपुट सेवांकरिता मर्यादित होते. डॉक्टर, पॅरा—मेडिकल सेवा आणि शैक्षणिक सेवा अशा प्रकारच्या काही सेवांना सेवा करमधून सूट होती. जीएसटीमध्येसुद्धा या सेवांना सूट असू शकेल.

स्वेच्छेने जीएसटी नोंदणी करावी का?

उलाढालीपेक्षा कमी कारभार असलेल्या आणि दोन राज्यांमध्ये पुरवठा न करणाऱ्या अनेक लघु व्यवसायांसाठी स्वेच्छेने नोंदणी करण्याचा पर्याय आहे. जर तुमचे ग्राहक जीएसटी संलग्न असतील तर त्याचा तुम्हालादेखील फायदा होऊ शकतो. याप्रकारे तुमचे ग्राहक तुमच्या इनपुट्ससाठी तुम्ही भरलेल्या करांचे क्रेडिट घेऊ  शकतील.

जीएसटी कायद्यानुसार जर नोंदणीकृत ग्राहकांनी अनोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी केली तर त्यांना अनोंदणीकृत विक्रेत्याच्या वतीने कर आकारणी व विवरणपत्र भरणे संदर्भात पूर्ण जीएसटी भरावा लागेल. प्रत्येक ग्राहक व विक्रेत्याला सामावून घेत जीएसटी लाभांनी युक्त असा स्वत:चा क्लब निर्माण करेल; पण त्याचवेळी व्यवसाय करण्यासाठी जीएसटी पालन करण्याचा तसेच तंत्रज्ञान अवलंबण्याचा खर्च त्यामध्ये समाविष्ट असेल. दोन्ही बाबी फायदेशीर गुंतवणूकीच्या आहेत.

(लेखक क्लिअरटॅक्स डॉटकॉमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Important issue related gst

ताज्या बातम्या