देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये ८७.८ कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये ६३२.७३६ अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे १.४६६ अब्ज डॉलर्सचे कमी होऊन ६३३.६१४ अब्ज डॉलर्सवर आलं होतं. तर २४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये ५८.७ कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन ६३५.०८ अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. १७ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा १६ कोटी डॉलर्सने घसरुन ६३५.६६७ अब्ज डॉलर्स वर आला होता.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आठडेवारीनुसार सात जानेवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये परदेशी चलन साठ्यात मोठी घट झाली. ही घट प्रामुख्याने फॉरेन करन्सी अॅसेट (एफसीए) म्हणजेच परदेशी चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये एफसीएचा महत्वाचा वाटा असतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालानुसार सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या एफसीएमध्ये ४९.७ कोटी डॉलर्सची घसरण झाली. आता भारताचा एफसीए ५६९.३९२ अब्ज डॉलर्स इतका आहे. डॉलरच्या स्वरुपात सांगितल्या जाणाऱ्या एफसीएमध्ये परदेशी चलनाच्या साठ्यातील यूरो, पाऊंड, येनसारख्या इतर देशांच्या चलनांचे मुल्यांकन करुन त्याचाही विचार समावेश केलेला असतो.

तसेच याच आठवड्यामध्ये भारताचे गोल्ड रिझर्व्ह म्हणजेच सरकारी तिजोरीमधील सोन्याच्या एकूण साठ्याचं मूल्यही ३६ कोटी डॉलर्सने कमी झालं आहे. हे मूल्य आता ३९.०४४ डॉलर इतकं आहे. सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात इंटरनॅशनल मॉनेट्री फंड म्हणजेच आयएमएफने देशाच्या एसडीआर म्हणजेच स्पेश ड्रोइंग राइट्सचे मूल्य १.६ कोटी डॉलर्सने कमी करुन १९.०९८ अब्ज डॉलर्स इतकं केलंय. आयएमएफने देशातील चलनाचा साठा सुद्धा ५० लाख डॉलर्सने घसरल्याचं सांगत होत आता ५.२०२ अब्ज डॉलर्स असल्याचं सांगितलंय.