येत्या तीन वर्षांत नोंदणीकृत पारंपरिक उद्योगांसाठी निधी उपलब्धततेची योजना नव्या नियमांसह सादर करण्याचा मनोदय केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी नुकताच मुंबईत व्यक्त केला.
रोजगारनिर्मितीत स्वयंरोजगारावर भर देणाऱ्या केंद्र सरकारने देशभरातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची योजना आखली असून याद्वारे भावी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असेही ते म्हणाले. इंडिया एसएमई फोरमने नुकत्याच आयोजित केलेल्या आघाडीच्या १०० उद्योगांना पुरस्कार देण्याचा समारंभ केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन याही उपस्थित होत्या. दुसऱ्या आवृत्तीतील हे पुरस्कार ६३,८१९ नामांकनांमधून आघाडीच्या १०० उद्योगांना मिळाले. पुरस्कारांबाबत फोरमच्या मुख्य संचालक सुषमा मोर्थानिया याही यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान उद्योजक संघटनेने आपल्या मागण्यांची यादी मंत्र्यांना सादर केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
पारंपरिक उद्योगांसाठी लवकरच निधी योजना : मिश्र
येत्या तीन वर्षांत नोंदणीकृत पारंपरिक उद्योगांसाठी निधी उपलब्धततेची योजना नव्या नियमांसह सादर करण्याचा मनोदय केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी नुकताच मुंबईत व्यक्त केला.
First published on: 12-08-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sme forum