पुण्याच्या महानगर पालिका हद्दीतील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार तेथील आघाडीची मालमत्ता विकासक कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने बुधवारी मार्गी लावला. वाकड येथे ३४ एकर जमिनीसाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची किमत कंपनीने मोजली आहे.
पुण्यात निवासासाठी सर्वाधिक पसंती दिली जाणारे वाकड येथील ही जमीन मुंबई-पुणे महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आणि हिंजेवाडी आयटी उद्यानाच्या जवळ आहे. कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार, या ठिकाणी १०० टक्के कोलते-पाटीलच्या मालकीचा निवासी आणि वाणिज्य असा मिश्र प्रकल्प साकारला जाणार असून, यातून एकूण २३ लाख चौरस फुटांचे विक्रीयोग्य क्षेत्रफळ विकसित होईल. बुधवार दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात कोलते-पाटीलचा समभाग २.१५ टक्क्यांनी वधारून ७५.९० रु. पातळीवर स्थिरावला.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘कोलते-पाटील’कडून पुण्यात जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार
पुण्याच्या महानगर पालिका हद्दीतील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार तेथील आघाडीची मालमत्ता विकासक कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने बुधवारी मार्गी लावला.
First published on: 06-02-2014 at 03:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolte patil developers does biggest land scam in pune