प्रिमियम हॅचबॅक श्रेणीत दशकापूर्वी भारतीय वाहन बाजारपेठेत उतरविण्यात आलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टने १३ लाख कार विक्रीचा टप्पा पार केला आहे. कंपनीने या गटातील पहिली कार २००५ मध्ये सादर केली होती.
स्विफ्ट नावांतर्गतच २००७, २०११ आणि २०१४ मध्ये तीन वेळा कारमध्ये बदल करून तीदेखील सादर करण्यात आली. स्विफ्टने एक लाख विक्रीचा टप्पा २००७ मध्येच गाठला होता. तर पुढील वर्षभरातच तिच्या दोन लाख वाहनांची विक्री झाली.
२०१० च्या सुरुवातीलाच कंपनीने ५ लाख स्विफ्ट विक्री नोंदविली; तर १० लाख स्विफ्ट विक्री होण्यास सप्टेंबर २०१३ पर्यंतचा कालावधी लागला.e03डिझेल इंधनावरील स्विफ्ट सर्वप्रथम २००७ मध्ये तयार करण्यात आली होती. पॅरिसच्या २००२ मधील वाहन प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आलेली स्विफ्ट जपानी बाजारपेठेत नोव्हेंबर २००४ मध्ये उतरविण्यात आली. यानंतर मे २००५ पासून ती भारतीय रस्त्यांवर धावायला लागली.