यूके इंडिया बिझनेस कौन्सिलच्या (यूकेआयबीसी) मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी, महाराष्ट्र आणि ब्रिटन दरम्यान वाढत्या औद्योगिक आणि व्यावसायिक भागीदारीची पायाभरणी करण्यात आली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र आणि ब्रिटनच्या उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत एक विशेष सामंजस्याचा करार ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)’सोबत याप्रसंगी करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाशी सुसंगत असलेला यूकेआयबीसी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील (एमआयडीसी) सामंजस्य करार ब्रिटनचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री लॉर्ड लििव्हग्स्टन आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जागतिक बँकेच्या ‘इझ ऑफ डूइंग बिझनेस इंडेक्स’मध्ये भारताची क्रमवारी सुधारण्यासाठी मुंबई देत असलेल्या योगदानाला ब्रिटनचे सहकार्य आणि तज्ज्ञ सल्ला मिळण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी सुभाष देसाई म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाशी सुसंगत ‘मेक इन महाराष्ट्र’ अशी आखणी आम्ही केली असून, महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक परवानग्यांची संख्या कमी करण्यासाठी संपूर्ण व्यवसाय प्रक्रियेचे फेरविश्लेषण आम्ही करीत आहोत.’’ या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी मदतच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘एमआयडीसी’बरोबरचा हा भागीदारी करार भारताची अर्थव्यवस्था अधिक स्पर्धात्मक आणि सक्षम बनविण्याच्या दृष्टीने घेतलेला एक महत्त्वाचा पुढाकार आहे. परदेशी उद्योगांना, विशेषत: मुंबईमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विविध क्षेत्रात सहकार्याला चालना देणाऱ्या दोन्ही देशांच्या इतिहासातील या अनोख्या काळात हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ‘यूकेआयबीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड हिल्ड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midc ukibc agreement
First published on: 17-01-2015 at 02:21 IST