केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात बळीराजासाठी देखील विशेष तरतुदी असल्याचे सांगितले आहे. अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर भर असणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा अवाम उथ्थान महाभियानाने फायदा झाला असल्याचे सांगत, त्यांनी आता याची व्यापी वाढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, या अंतर्गत देशभरातील तब्बल २० लाख शेतकऱ्यांना सौरपंप बसवून दिले जाणार आहे.

पाण्याशी संबंधित मुद्दे आता देशभरातील चिंतेचा विषय बनत आहेत. पाण्याची गंभीर समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांसाठी ठोस उपयायोजना केल्या जाण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा अवाम उथ्थान महाभियानांतर्गत सौरपंपासाठी देशभरातील जवळपास २० लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

आणखी वाचा – शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणार; २.८३ लाख कोटी रु.ची तरतूद

शेतकऱ्यांचे बजेट मांडताना सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे तसेच ६.११ कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजनेचा लाभ होत असल्याचे सांगितले. पंतप्रधान कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे असे त्या म्हणाल्या. अन्न दात्याला ऊर्जादाता बनवण्यावर भर देणार असल्याचे सांगताना कृषी क्षेत्रासाठी मार्केटिंग-प्रोसेसिंगवर भर देणार असे त्या म्हणाल्या. २० लाख शेतकऱ्यांसाठी सोलार पंप योजना त्यांनी जाहीर केली आहे.

आणखी वाचा – Budget 2020 : शेतकऱ्यांचा माल जाणार आता रेल्वेच्या एसी डब्यातून

शेतजमिनीचा चांगला वापर करून अधिक उत्पन्न कसं घेता येईल, यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना सहाय्य देणार व त्यांच्यासाठी खास योजना असेल असे सीतारामन म्हणाल्या. कृषी क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.