रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नुकतेच किसान क्रेडिट कार्डचे सादरीकरण करण्यात आले. अलिबाग येथे झालेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने नाबार्डचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बक्षी, बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक तसेच राज्याच्या सहकार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, नॅशनल पेमेन्टस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. होटा, सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी तसेच अतिरिक्त सहकार आयुक्त दिनेश औलकर आदी उपस्थित होते. याअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत हे कार्ड उपलब्ध होणार असून त्यांना देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएमद्वारे रोकड काढता येणार आहे.