आघाडीची राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार राज कुमार गोयल यांनी अलीकडेच स्वीकारला. राजीव किशोर दुबे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. बँकिंग क्षेत्रात ३५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या गोयल यांची यापूर्वी बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) म्हणून तसेच त्या बँकेच्या लंडन शाखेत कारकीर्द राहिली आहे.