घरखरेदीला चालना
माफक दरातील घर खरेदीला प्रोत्साहनाच्या सरकारच्या धोरणाला सुसंगत असा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी घेतला. आता ३० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरासाठी ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज ग्राहकांना मिळू शकेल. सध्या ही मर्यादा केवळ २० लाख रुपये किमत असलेल्या घरांपुरतीच होती. ती आता ३० लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी विस्तारली असून याचा लाभ माफक दरातील घर खरेदीदारांना होऊ शकेल. सर्वसाधारणपणे माफक दरातील घरांचे मूल्य ४० लाख रुपयांपर्यंत गृहीत धरले जाते. ३० लाखांपुढे ते ७५ लाख रुपये दरम्यानच्या घरांसाठी मालमत्तेच्या मूल्याच्या ८० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकेल. तर त्यावरील किमतीच्या घरासाठी ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज बँका तसेच वित्त संस्था देऊ शकतील. या मंजूर कर्ज मर्यादेव्यतिरिक्त रक्कम घर खरेदीदाराने उभी करावयाची असते.

Maratha quota case update
मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलली, आतापर्यंत काय काय घडले?
infosys q4 results infosys returns 1 1 lakh crore to shareholders in 5 fiscal years
इन्फोसिसच्या भागधारकांना पाच वर्षात १.१ लाख कोटींचा धनलाभ!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!