विविध अल्प बचत योजनांवरील व्याज दर चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीसाठीदेखील स्थिर ठेवण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केला.
जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी बँकेच्या बचत खात्यांवर वार्षिक ४ टक्के, पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींवर वार्षिक ७.४ टक्के व ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर वार्षिक ८.६ टक्के व्याज कायम राहणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) ८.१ टक्के, ११० महिने मुदतीच्या किसान विकास पत्राकरिता ७.८ टक्के असा व्याज दर यापुढेही असेल. सुकन्या समृद्धी खाते योजनेवर वार्षिक ८.६ टक्के स्थिर दर आहे. विविध बचत योजनांवरील व्याजदर दराचे तिमाहीला निर्धारणाची प्रक्रिया एप्रिल २०१६ पासून सुरू झाली. एप्रिल २०१६ नंतर व्याज दरात लक्षणीय कपात केली गेली होती.
जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी लागू व्याज दर
बँक बचत खाते    ४ %
बँक आवर्ती ठेवी (५ वर्षे)    ७.४ %
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (५वर्षे)    ८.६ %
सार्व. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)    ८.१ %
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र    ८.१ %
किसान विकास पत्र    ७.८ %
पोस्ट मुदत ठेव (५वर्षे)    ७.९ %
पोस्ट आवर्ती ठेव (५ वर्षे)    ७.४%
पोस्ट बचत ठेव (एक वर्ष)    ७.१%
सुकन्या समृद्धी खाते     ८.६ %