रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई करत एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. परवाना रद्द केल्याची घोषणा करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. या कारणास्तव या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून आता बँकेला ठेवी परत करण्यास आणि नवीन ठेवी ठेवण्यास परवानगी देण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझर्व्ह बँकेने बुधवारी बागलकोट (कर्नाटक) येथील मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा परवाना रद्द केला. या बँकेस ‘बँकिंग’ व्यवसाय करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये सुविधेव्यतिरिक्त, ठेवी स्वीकारणे आणि पैसे भरणे मज्जाव करण्यात आला आहे. आरबीआयने असेही म्हटले आहे की सध्या ज्या आर्थिक स्थितीत बँक आहे, त्यामध्ये ती आपल्या ठेवीदारांना पूर्ण देय देऊ शकणार नाही.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi revoked this bank license find out what will happen to customer deposits pvp
First published on: 11-06-2022 at 11:31 IST