मुंबई : डॉलरच्या तुलनेत सलगपणे घसरण नोंदविणाऱ्या रुपयाने मंगळवारी एकाच व्यवहारात आणखी ४१ पैशांची आपटी नोंदविली. डॉलरसमोर मोठय़ा फरकाने कमकुवत होत स्थानिक चलन आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ७९.३६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावले. जागतिक पातळीवर इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत प्रबळ होणारा डॉलर, देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती याच्या एकंदर परिणामी रुपयाने डॉलरपुढे नांगी टाकली.

केंद्र सरकारच्या घसरणरोधी उपाययोजना आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाने गेले काही दिवस सलगपणे नवनवीन नीचांक गाठणारी मालिका कायम राखली आहे. सोमवारी ७८.९५ वर बंद झालेल्या रुपयाने मंगळवारच्या सत्राची सुरुवात ७९.०४ या नरमाईनेच केली. सत्रात चलन ७९.०२ पर्यंतच मूल्यवृद्धी शकले, तर व्यवहारादरम्यान त्याचा ७९.३८ हा ऐतिहासिक तळ राहिला. रुपयाच्या घसरणीची वाढलेली तीव्रता पाहता, त्याने प्रति डॉलर ८० ची वेस ओलांडण्याचे अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलेले भाकीत प्रत्यक्षात फार दूर नसल्याचे बोलले जात आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
pimpri chinchwad marathi news, 17 year old boy killed his minor friend marathi news
पिंपरी चिंचवड : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात आणखी वाढ केली जाणार असल्याने अमेरिकी डॉलर अधिक प्रबळ झाला आहे. मात्र खनिज तेलाच्या निर्यातीवर लावण्यात आलेला करभार आणि सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे रुपयाच्या मूल्याला स्थिरता मिळण्याची शक्यता आहे, असे मत शेअरखान- बीएनपी परिबाचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी व्यक्त केले.