देशातील सर्वात मोठे कर्जवाटप असलेल्या भारतीय स्टेट बँकने वाढत्या अनुत्पादित कर्जाला आळा घालण्यासाठी कर्जदारांचे पतमापन हे वर्षांतून एकदा न होता वेळोवेळी व आवश्यकता भासेल तेव्हा करण्याचे ठरविले आहे. स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकेच्या अर्धवार्षकि निकालानंतर हे स्पष्ट केले.
स्टेट बँकेने आपल्या कर्जदारांचे वर्गीकरण एसबी-१ ते एसबी-१५ अशा वेगवेगळ्या पतगटांत केले आहे. हे पतनिर्धारण वर्षांतून एकदा करण्याची स्टेट बँकेची पद्धत आहे.
याबाबत भट्टाचार्य म्हणाल्या की, वाढत्या अनुत्पादित कर्जाना आळा घालण्यासाठी हे पतनिर्धारण वर्षांतून एकदा करणे पुरेसे नाही. वर्षभरात आíथक व व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल होत असतात. हे बदल जाणून पत कमी किंवा अधिक होणे गरजेचे असते. म्हणून पतनिर्धारण केवळ वर्षांतून एकदा न होता आवश्यकता भासेल तेव्हा करेल, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहयोगी बँकांचे विलीनीकरण
स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाबाबत त्या म्हणाल्या की, याबाबत स्टेट बँकेने अंतर्गत एक पथदर्शक प्रस्ताव तयार केला असून, सरकारच्या विचारार्थ केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडे विचारार्थ पाठवला आहे.

बँकेची निधी उभारणी
स्टेट बँकेच्या निधी उभारणीबाबत त्या म्हणाल्या की, स्टेट बँक समभागांची खुली देशांतर्गत विक्रीसोबत हक्कभाग व जीडीआर यांचाही विचार करत असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला असून दीड ते दोन वर्षांनंतर आíथक वर्ष २०१६ मध्ये ही विक्री करण्याचा स्टेट बँकेचा विचार आहे. बँकेचे समभाग सरकारला प्राधान्य तत्त्वावर वितरित करून निधी उभारण्याचाही बँकेचा विचार आहे.

व्याजदराबाबत..
देशांतर्गत व्याजदरांवर भाष्य करताना अध्यक्षा म्हणाल्या की, १० वष्रे मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या किमती संभाव्य व्याज दर कपातीमुळे वाढल्या आहेत. याचा फायदा घेत स्टेट बँकेने नफावसुलीसाठी काही रोखे विकल्यामुळे अन्य उत्पन्नात वाढ झाली. देशांतर्गत व्याज दरांबाबत त्या म्हणाल्या की, बँक भविष्यात व्याज दर कपात नक्की करेल. व्याजदर कपात करण्याचा निर्णय केवळ महागाईसारख्या एका अथवा दोन आकडय़ांवर न ठरता हे सर्वसमावेशक धोरण असते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

खर्च आणि एटीएम वापर
मुक्त एटीएम वापरावर मर्यादा घालण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना भट्टाचार्य यांनी, स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एका वेळच्या एटीएम वापराचा खर्च स्टेट बँकेच्या एटीएम जाळ्यावर अकरा रुपये, तर अन्य बँकेचे एटीएम वापरल्यास स्टेट बँकेला १८ रुपये खर्च येतो, असे स्पष्ट केले. स्टेट बँकेच्या परिचालन खर्चात एटीएम वापराचा खर्च वजा केल्यास कपात झाली आहे. परंतु दिवसेंदिवस एटीएम वापराच्या खर्चात वाढ होत आहे. १००० रुपये किमान शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांनी महिन्यातील चार वेळा एटीएम वापरल्यास मोठा खर्च सहन करावा लागतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi will try to stop unproductive loans in future says arundhati bhattacharya
First published on: 18-11-2014 at 12:38 IST