उंचावलेले निर्देशांक, पतधोरणानंतर सपाटीला!

गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफेखोरीमुळे दिवसाच्या प्रारंभी २०० अंशांनी वधारलेल्या सेन्सेक्सला मंगळवार अखेर किरकोळ वाढीवर समाधान मानत विश्राम घ्यावा लागला.

मुंबई : गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफेखोरीमुळे दिवसाच्या प्रारंभी २०० अंशांनी वधारलेल्या सेन्सेक्सला मंगळवार अखेर किरकोळ वाढीवर समाधान मानत विश्राम घ्यावा लागला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजाचे दर स्थिर ठेवण्याचे पतधोरण आल्यानंतर, वरच्या भावावर समभागांच्या विक्रीचा सपाटा सुरू झाला. भांडवली बाजारात मंगळवारी व्याजदराशी निगडित कंपन्यांच्या समभागांनी जबर घसरण नोंदविली. ३३.४० अंश वाढीसह सेन्सेक्स २६,६३०.५१ वर स्थिरावला. तर निफ्टी ८.९० अंश वाढीसह ७,९६४.८० पर्यंत गेला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदराच्या पतधोरणावर स्थावर मालमत्ता, बँक, वाहन क्षेत्रातील सूचिबद्ध समभागांचे मूल्य सहा टक्क्यांपर्यंत घसरले.
आपटीत आघाडी..
इंडियाबुल्स रिअल इस्टेट      ” ६७.५५    -५.३३%
डीएलएफ                             ” १५०.८५    -४.७७%
बँक ऑफ इंडिया                   ” २३१.७५    -३.५४%
अ‍ॅक्सिस बँक                        ” ३७७.८०    -२.१८%
मिहद्र अ‍ॅण्ड महिंद्र                 ” १,३६२.३०    -१.६२%
टाटा मोटर्स                            ” ३४५.४०    -१.५७%

रुपया सात महिन्यांच्या तळातच
भारतीय चलनाचा सात महिन्यांतील नीचांकाचा प्रवास सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी २२ पैशांनी घसरत ६१.७५ पर्यंत घसरला. ६१च्या खालचा प्रवास करणारे चलन सप्ताहारंभीच्या व्यवहारातही असेच कमकुवत बनले होते. रुपयाची सध्याची पातळी ही ५ मार्च रोजीच्या ६१.७५ या स्तरावरच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex ends lower in volatile trade ahead of rbi policy review