मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात निर्देशांकात सर्वाधिक वजन असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिसच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला. परिणामी प्रमुख निर्देशांक गुरुवारी एक टक्क्याहून अधिक तेजी दर्शवित स्थिरावले. दिवसअखेर सेन्सेक्स ७०१.६७ अंशांनी उसळून ५७,५२१.०६ पातळीवर बंद झाला. निफ्टीने २०६.६५ अंशांची कमाई केली आणि तो १७,२४५.०५ पातळीवर स्थिरावला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2022 रोजी प्रकाशित
‘सेन्सेक्स’मध्ये ७०१ अंश वाढ
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात निर्देशांकात सर्वाधिक वजन असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिसच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-04-2022 at 01:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex up 701 points domestic capital market index positive signs ysh