चँगयू डॉट कॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ‘गेमिक्शन डॉट कॉम’ (www.Gamiction.com) नावाचे नवीन ऑनलाइन गेमिंग पोर्टलची मुंबईत समारंभपूर्वक घोषणा केली. यातून अद्वितीय साहसांनी भारलेल्या ब्राऊजिंगच्या आधुनिक विश्वाचा अनुभूती कंपनीने देऊ केली आहे. ‘रायिजग सागा’ हा स्वप्नवत ऑनलाईन गेम असून त्यात विविध प्रकारच्या कुशलतांमधून आपल्या भूमीचे रक्षण करणारे शूर व्यक्तीमत्व विकसित करण्याची सोय आहे. या गेममध्ये विविध प्रभावी व्यक्तीरेखा त्यांच्या विशिष्ट प्रावीण्यासह आणि कलाकृतींसह  आरपीजी कॅरॅक्टरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे रायिजग सागासाठी महागड्या हार्डवेअरची आवशक्यता नसून तो जोडणे आणि खेळणे अत्यंत सोपे आहे. तसेच http://www.gamiction.com  संकेतस्थळावर लॉगइन करुनही रायिझग सागाशी संपर्क होऊ शकतो.