भारतात लहान शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात अग्रणी समजल्या जाणाऱ्या नोवा वैद्यकीय केंद्राने रुग्णांना दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवा पुरविण्याच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. नोवाने रक्कम अदा करण्याचे निरसन करणारी अग्रगण्य कंपनी पाइन लॅबशी भागीदारी करीत रुग्णांच्या सोयीनुसार मासिक हप्त्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ३, ६, ९ किंवा १२ महिन्यांच्या मासिक हप्त्यांचा पर्याय याद्वारे दिला आहे. नोवा वैद्यकीय केंद्र या मूळ कंपनीने ही योजना त्यांच्या सर्व शस्त्रक्रिया केंद्र, नोवा स्पेशालिटी हॉस्पिटल, फर्टिलिटी सेंटर्स, नोवा आयव्हीआय फर्टिलिटी यामध्ये कार्यान्वित केली आहे. याबाबत नोवा वैद्यकीय केंद्राचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेश सोनी यांनी सांगितले की, भारतामधील एकूण लोकसंख्येमधील मोठा भाग हा आरोग्य विम्याच्या बाहेर आहे; त्यामुळे त्यांना अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. याच आवश्यकतेचा विचार करून मासिक हप्त्यांची संकल्पना मांडण्यात आली आहे. ज्यामुळे  दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी मदतीवर अवलंबून न राहता उपचारांवरील खर्चाच्या रकमेची सुलभ आणि क्रमाक्रमाने परतफेड करता येऊ शकते.