दहाहून अधिक बँकांनी कोटय़वधींचे कर्जबुडवे म्हणून जाहीर केलेले विजय मल्ल्या हे आता भारत सोडून जाणार असून ते ब्रिटनमध्ये स्थायिक होणार आहेत. अध्यक्षपदाचा हट्ट राखणाऱ्या मल्ल्या यांनी अखेर दिआज्जिओचे वर्चस्व असलेल्या यूनायटेड स्पिरिट्सवरून (यूएसएल) पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात मल्ल्या यांना ७.५ कोटी डॉलर (५१५ कोटी रुपये) मिळणार आहेत. मल्ल्या यांच्या यूनायटेड स्पिरिट्सवर ब्रिटनच्या दिआज्जिओने निम्म्याहून अधिक हिस्सा खरेदी करत मालकी मिळविली आहे. मात्र असे होऊनही मल्ल्या यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2016 रोजी प्रकाशित
मल्ल्या भारताबाहेर जाणार; ‘यूएसएल’चा अखेर राजीनामा
कोटय़वधींचे कर्जबुडवे म्हणून जाहीर केलेले विजय मल्ल्या हे आता भारत सोडून जाणार

First published on: 26-02-2016 at 04:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya quits as united spirits chairman