कामत हॉटेल्स (इं.) लिमिटेडचा भाग असलेली लक्झरी बिझनेस हॉटेल्सची शंृखला विट्स हॉटेल्सला नुकत्याच मुंबईत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आयोजित पाचव्या गोल्डन स्टार पुरस्कार सोहळ्यात विविध पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्टार ऑफ द इंडस्ट्री समूहातर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विट्स हॉटेल मुंबई आणि विट्स हॉटेल पुणे यांनी रेस्टॉरन्ट, बार, कॉफी शॉप, कन्व्हेन्शन सेंटर या चार वर्गवारीत सवरेत्कृष्टतेचे तसेच वैयक्तिक श्रेणीत मोस्ट अॅडमायर्ड फ्रंट ऑफिस मॅनेजर ऑफ द इयर असे एकूण पाच पुरस्कार पटकावले. सध्या मुंबईसह, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, दिल्ली आणि भुवनेश्वर या शहरात विट्स हॉटेल्स कार्यरत असून, आगामी पाच वर्षांत आणखी २० विट्स हॉटेल्स सुरू करण्याची कामत समूहाची योजना आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2013 रोजी प्रकाशित
विट्स हॉटेल्सचा पाच ‘गोल्डन स्टार’ पुरस्कारांनी गौरव
कामत हॉटेल्स (इं.) लिमिटेडचा भाग असलेली लक्झरी बिझनेस हॉटेल्सची शंृखला विट्स हॉटेल्सला नुकत्याच मुंबईत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आयोजित पाचव्या गोल्डन स्टार पुरस्कार सोहळ्यात विविध पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
First published on: 06-03-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vits hotel get 5 stars hounred