13 August 2020

News Flash

नव्याने ओळख बनविताना..

वाहन उद्योग हे या फंडाच्या निधी व्यवस्थापनाने आपल्या पसंतीचे चौथे उद्योग क्षेत्र निश्चित केले आहे.

फंड विश्लेषण

बिर्ला सनलाइफ अ‍ॅडव्हांटेज फंड

प्रत्येक फंड घराण्याचा एक विशिष्ट फंड त्या त्या घराण्याची ओळख बनून राहतो. जसे की ‘एचडीएफसी टॉप २००’ ही एचडीएफसी किंवा ‘आयसीआयसीआय प्रुडेंशियल फोकस्ड ब्लूचीप’ ही आयसीआयसीआय प्रुडेंशियल या फंड घराण्याची ओळख आहे. त्या त्या फंड घराण्याचे निधी व्यवस्थापकदेखील ही ओळख पुसली जाऊ नये म्हणून अटोकाट प्रयत्न करीत असतात. २४ फेब्रुवारी १९९४ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेला ‘बिर्ला सनलाइफ अ‍ॅडव्हांटेज फंड’ हा बिर्ला म्युच्युअल फंडाची (त्या वेळी बिर्लाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीत सनलाइफ ही बहुराष्ट्रीय कंपनी भागीदार नव्हती.) बारा-पंधरा वर्षांपूर्वी असाच दबदबा बनवून होता.

बिर्ला म्युच्युअल फंड म्हटले की जरी ‘बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी’ ही या फंड घराण्याची आजची ओळख असली तरी पूर्वी बिर्ला अ‍ॅडव्हांटेज फंड हे नाव डोळ्यापुढे येत असे. पंधरा वर्षांपूर्वी या फंडाची १००० कोटींची मालमत्ता असल्याने हा फंड देशातील सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड होता. बिर्ला म्युच्युअल फंडाचे तत्कालीन मुख्य गुंतवणूक अधिकारी भरत शहा यांनी ही ओळख या फंडाला मिळवून दिली होती. कधी काळी वार्षकि तीन आकडय़ांत परतावा देणाऱ्या या फंडाने ‘वायटूके’च्या संधीवर स्वार होणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक केली होती. या समभागांची वेगाने भांडवली वृद्धी झाल्यामुळे या फंडाने दमदार परतावा दिला. साहजिकच हा फंड चच्रेत राहिल्याने हा फंड बिर्ला म्युच्युअल फंडाची ओळख बनला. नवीन शतकाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटवर आधारित डॉटकॉम कंपन्यांचा फुगा फुटल्याने या कंपन्यांच्या समभागाची धूळधाण उडाल्याने या फंडाची एनएव्हीदेखील गडगडली. पुढील दहा वष्रे या फंडात अनेक संक्रमणे घडली. २०१० पासून हा फंड वावटळीतून सावरला असून सध्या या फंडाची पुन्हा दमदार वाटचाल सुरू झाल्याने बिर्ला सनलाइफ या फंड घराण्याची सध्याची ओळख असलेल्या बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटीआधी या फंडाची शिफारस करीत आहे.

१५ जानेवारी रोजी ग्रोथ विकल्पाची २७५.१० एनएव्ही असलेल्या या फंडाने गुंतवणूकदारांना परताव्याच्या बाबतीत मुळीच निराश केलेले नाही. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०१६ या कालावधीत १००० च्या ‘सीप’चे १८००० चे ५ जानेवारीच्या एनएव्हीनुसार बाजार मूल्य ७३८४८४.२३ असून परताव्याचा दर २८.९१ % आहे. १ जानेवारी २०१३ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत या फंडात दरमहा १००० ची ‘सीप’ केलेल्या गुंतवणूकदारांच्या ३६००० चे ५ जानेवारीच्या एनएव्हीनुसार ५१४६१.५२ इतकी भांडवली वृद्धी झाली आहे. या गुंतवणुकीवर परताव्याचा दर २५.९१% इतका असून मागील एका वर्षांत १००० ची ‘सीप’ करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या १२००० चे ११९७७.८१ इतके बाजारमूल्य असून परताव्याचा दर -०.४५% आहे.

हा फंड मल्टीकॅप प्रकारचा फंड आहे. एकूण गुंतवणुकीच्या ७० ते ८० टक्के गुंतवणूक निधी व्यवस्थापकाच्या पसंतीच्या तीन ते चार उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात केली जाते. आíथक आवर्तनाच्या परिस्थितीनुसार ही पसंतीच्या उद्योग क्षेत्रांची निवड फंड व्यवस्थापन करते. विद्यमान गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती फंड व्यवस्थापनाने बँका व वित्तीय सेवा क्षेत्राला दिली असून त्या पाठोपाठ गुंतवणुकीसाठी ‘एव्हरग्रीन’ समजल्या जाणाऱ्या औषध निर्माण क्षेत्रासोबत कमी झालेले व्याज दर व सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाच्या पाश्र्वभूमीवर खाजगी क्षेत्राकडून क्षमता वाढीचे धोरण अपेक्षित आहे. याचा सकारात्मक परिणाम भांडवली वस्तू व यंत्रसामुग्री यांच्यावर होण्याच्या अपेक्षेने फंडाने गुंतवणुकीसाठी आपल्या पसंतीचे हे उद्योग क्षेत्र निश्चित केले आहे. वाहन उद्योग हे या फंडाच्या निधी व्यवस्थापनाने आपल्या पसंतीचे चौथे उद्योग क्षेत्र निश्चित केले आहे.

मल्टीकॅप प्रकारचा फंड असल्याने या फंडाच्या एकूण गुंतवणुकीपकी २५ ते ४० टक्के गुंतवणूक वर उल्लेख केलेल्या पसंतीच्या उद्योग क्षेत्रातील मिडकॅप प्रकारच्या समभागात असते. मिडकॅप हे लार्ज कॅपहून अधिक परतावा देणारे असल्याने या फंडाचा परतावा व (जोखीमदेखील) या फंड घराण्याच्या अन्य फंडांहून अधिक आहे. मागील दोन वर्षांत योग्य मूल्यांकन असलेल्या मिडकॅप कंपन्यांतून गुंतवणूक केल्याचा फायदा परताव्याच्या रूपाने दिसून येत आहे. या फंडाच्या आघाडीच्या गुंतवणुकीत असलेले आयशर मोटर्स व नॅटको फार्मासारखे समभाग फंडाच्या निधी व्यवस्थापन धोरणाची दिशा स्पष्ट करते. फंडाने गुंतवणूक केलेला नॅटको फार्मासारखा समभाग फंडाने खरेदी केल्यापासून दुप्पट झाला आहे. थॉमस कूक, पर्सस्टिंट सिस्टीमसारख्या गुंतवणूकांनी आपली जबाबदारी चोख पाडली आहे. आवश्यक तेथे समभागकेंद्रित गुंतवणूक करून धोका पत्करून अधिक परतावा मिळविण्याचे फंडाचे सुरुवातीपासून अंगीकारलेले धोरण आजही कायम आहे.

एस अँड पी बीएसई २०० हा निर्देशांक या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. मागील पाच वर्षांतील वेगवेगळ्या आíथक आवर्तनाच्या काळात या फंडाने संदर्भ निर्देशांकाहून अधिक परतावा दिला असल्याने हा फंड साहजिकच गुंतवणुकीत महत्त्वाचा (Core Holding) ठरतो. मागील पाच वर्षांत या फंडाने वेगवेगळ्या तिमाहीत संदर्भ निर्देशांकाहून किमान -१.५५ (२०१५ची दुसरी तिमाही) असा उणे ते कमाल १८.९२ टक्के (२०१४ची चौथी तिमाही) अधिक परतावा दिलेला आहे. तीन ते पाच वर्षे मुदतीच्या एसआयपी गुंतवणुकीसाठी या फंडाची गुंतवणूकदारांनी निवड करावी.

बिर्ला सनलाइफ अ‍ॅडव्हांटेज फंडाची उद्योग क्षेत्रानुसार गुंतवणूक  

Untitled-7

वार्षकि परताव्याची चलत सरासरी

Untitled-8

shreeyachebaba@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2016 12:17 am

Web Title: article on fund analysis 2
टॅग Fund Analysis
Next Stories
1 अभियांत्रिकी विश्वासार्हता
2 आरोग्य विमा खर्च नव्हे गुंतवणूक
3 नव्या वर्षांचे नवे संकल्प!
Just Now!
X