News Flash

पुन्हा नव्याने गुंतवणूक-पाठ!

सध्या शेअर बाजारात अशी परिस्थिती आहे कीे, अनेक उत्तमोत्तम कंपन्यांचे शेअर्स केवळ मंदीमुळे रसातळाला गेले आहेत. वेळोवेळी असे शेअर्स खरेदी करून ठेवल्यास शेअर बाजार कल्पनातीत

| August 19, 2013 08:55 am

सध्या शेअर बाजारात अशी परिस्थिती आहे कीे, अनेक उत्तमोत्तम कंपन्यांचे शेअर्स केवळ मंदीमुळे रसातळाला गेले आहेत. वेळोवेळी असे शेअर्स खरेदी करून ठेवल्यास शेअर बाजार कल्पनातीत फायदा निश्चितच करून देऊ शकतो..

गुंतवणूक करताना कुठली गुणोत्तरे महत्वाची असतात ते एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल. परंतु काही नवीन वाचकांच्या मागणीप्रमाणे पुन्हा एकदा ही गुणोत्तरे खाली देत आहे. आता बहुतांशी कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे आíथक निष्कर्ष जाहीर झालेले आहेत. आíथक निष्कर्ष तपासते वेळी इतर बाबीखेरीज ही गुणोत्तरेही तपासून पाहा.
(१) प्रति समभाग उत्पन्न (एढर):
  करोत्तर नफा / एकूण समभागांची संख्या
(२) प्राइस अìनग गुणोत्तर (ढ/ए):
   समभागाचा बाजारभाव/ प्रति समभाग उत्पन्न
(३) पुस्तकी मूल्य (इ‘ श्ं’४ी):
भाग भांडवल+राखीव निधी/ एकूण समभागांची संख्या
(४) डेट इक्विटि गुणोत्तर:
  एकूण कर्जे/ भरणा झालेले भाग भांडवल

आíथक निष्कर्ष तपासताना कुठलाही गुंतवणूकदार उलाढाल आणि नक्त नफा तपासतो. परंतु खरे तर प्रत्येक बाब तुलनात्मक दृष्टीकोनातून तपासणे जरूरी असते. यात प्रामुख्याने खर्च, अपवादात्मक बाबी, वित्तीय खर्च/ व्याज, प्रवर्तकांचा भाग भांडवलातील हिस्सा आणि त्यातील तारण ठेवलेले समभाग आणि त्यांचे प्रमाण वगैरे सर्वच बाबी महत्वाच्या असतात. या खेरीज जाहिरातीत दिलेल्या तळ-टीपाही जरूर वाचाव्यात.
शेअर बाजाराचा आणि माझा अनेक वर्ष संबंध आहे गुंतवणूकदार, विश्लेषक, सल्लागार अशा अनेक प्रकारांनी तो वाढतच गेला. २५ वर्षांच्या या कालावधीत मी अनेक वेळा पसे घालवलेही आहेत. आता मागे वळून बघताना मला गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा (यात मी स्वत:ही आलोच!) विचार करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे आपण नफ्यातील शेअर्स गुंतवणूकदार आनंदाने विकू शकतो. परंतु तोट्यातील शेअर्स मात्र असेच ठेवून वाढणारा तोटा तो बघत बसतो. खरं तर एखाद्या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे हे माहिती असते तसेच ही मंदी अजून काही काळ तरी राहील याचीही खात्री असते. परंतु तरीही ते शेअर्स विकले तर तोटा पदरात पडेल या एकमेव कारणामुळे आपण तो शेअर पोर्टफोलियोमध्ये ठेवून केवळ वाढणारा तोटा बघत बसतो. त्या ऐवजी तो शेअर लागलीच थोडासा तोटा सहन करून विकून टाकून त्या ऐवजी दुसरा शेअर खरेदी केला तर फायदा होऊ शकतो. परंतु तोटा पदरात पडणे ही बाब पचनी पडू शकत नाही. आणि केवळ याच कारणास्तव अनेक गुंतवणूकदार वर्षांनुवष्रे एखादा शेअर तो काही वर्षांनी वाढेल या आशेवर ठेवून देतात.
अर्थात काही नवीन-अभिनव प्रकल्प घेऊन येणारे किंवा ब्लूचिप्स शेअर्स राखून ठेवण्यासाठीच असतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर विश्वास असेल तरीही तुम्ही असे शेअर्स ठेवू शकता किंवा प्रत्येक टप्प्याला खरेदी करून त्याची सरासरी किंमत कमी करू शकता. अर्थात तोटा किती सहन करायचा आणि तो शेअर किती काळ आपल्याकडे ठेवायचा याचाही विचार करायला हवाच, नाही का? सध्या शेअर बाजारात अशीच काहीशी परिस्थिती आहे. काही उत्तम कंपन्यांचे शेअर्स केवळ मंदी मुळे रसातळाला गेले आहेत. वेळो वेळी असे शेअर्स खरेदी करून ठेवल्यास शेअर बाजार किती फायदा करून देऊ शकतो ते तुम्हाला कळेलच.

परताव्याची हमी!

भारतातील कुठल्याही वाहन चालकाला बॅटरीबद्दल विचारलं तर तो एक्साइडचं नाव घेईल. एक्साइड इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी औद्योगिक आणि ऑटोमोबाइल बॅटरीचे उत्पादन करणारी कंपनी असून तिचे भारतात सात ठिकाणी कारखाने आहेत. बॅटरी उत्पादनाबरोबरच कंपनी आता यूपीएस आणि इन्व्हर्टरचे उत्पादनही आपल्या उत्तराखंड येथील कारखान्यांतून करते. यंदाच्या आíथक वर्षांत कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत असून त्या करीता सुमारे २५० कोटी रुपये खर्च करेल. सर्वाधिक विविध क्षमतेच्या स्टोरेज बॅटरीचे ( 2.5 अँ ते 20,400अँ) उत्पादनं करणारी एक्साइड ही जगातील एकमेव मोठी कंपनी आहे. भारतातील तयार होणाऱ्या एकूण मोटारींच्या उत्पादनापकी ८०% मोटारीत एक्साइडची बॅटरी फिट केली जाते. बॅटरी उत्पादनासाठी कंपनीने जपानच्या शिनकोबे डेंकी या कंपनीबरोबर तांत्रिक करार केला असून अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे विविध प्रकारच्या औद्योगिक बॅटरीज बनवणारी एक्साइड ही जगातील एकमेव मोठी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांकरीता कंपनीने ६०७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२२.७८ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला होता. यंदाच्या पहिल्या तिमाहीतही मंदीच्या वातावरणात कंपनीने १,६२७.४७ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून १५८.८० कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्याच वर्षांत आयएनजी वैश्या लाइफ इन्श्युरन्स एक्साइडने आपल्या ताब्यात घेऊन वेगळ्याच क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. सध्या आयएनजी याच नावाने विमा व्यवसाय चालणार असला तरी लवकरच कंपनी आपला या क्षेत्रातील भागीदार जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. सध्या १३०च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर सहा महीने ते वर्षभरात २०% परतावा देऊ शकेल.

एक्साइड इंडस्ट्रीज लि.
सद्य बाजारभाव     रु.  १३१.०५
प्रमुख व्यवसाय    बॅटरीज्
भरणा झालेले भाग भांडवल     रु. ८५ कोटी
पुस्तकी मूल्य      रु.  ४०.०    
दर्शनी मूल्य      रु. १
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    रु. ६.२
किंमत उत्पन्न गुणोत्तर  (पी/ई)    २१ पट
बाजार भांडवल :   रु. १०,४४२ कोटी    बीटा : ०.५
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक       :  रु. १६६/ रु. ११५

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ४५.९९
परदेशी गुंतवणूकदार    १७.३३    
बँका / म्युच्युअल फंडस्    १४.४८
सामान्यजन  व इतर    २२.२०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 8:55 am

Web Title: view of exide industries ltd
टॅग : Business News
Next Stories
1 जबाबदार कोण?
2 यूटीआय एमएनसी फंड
3 गुंतवणूक जोखीम आणि गुंतवणूकदार
Just Now!
X