गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने रोज नवनवे उच्चांक गाठले आहेत. गुरुवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुति सुझुकी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, आरआयएल या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. मात्र, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एम अँड एम, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचटीएफसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांना शेअर्स वर ठेवण्यासाठी आज बराच काथ्याकूट करावा लागला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2021 रोजी प्रकाशित
Sensex Today : सेन्सेक्सनं गाठला नवा उच्चांक! ६१ हजारांवर विक्रमी झेप; निफ्टीनंही घेतली उसळी
मुंबई शेअर बाजारामध्ये आज सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत बाजारात तेजी परतत असल्याचं दाखवून दिलं. त्यापाठोपाठ निफ्टीनं देखील विक्रमी झेप घेतली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 14-10-2021 at 10:56 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse today sensex infosys share crosses 61000 nifty above 18000 pmw