जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरुद मिळविणारी भारताच्या राज्य व्यवस्थेतील निवडणुकीने अर्थव्यवस्थेवर होणारा बदल चार भागांच्या लेखमालेतून समजून घेत आहोत. ऑटो व माध्यमे ही अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे या महत्त्वाच्या ‘इव्हेंट’चे लाभार्थी असणार आहेत हे आजपर्यंतच्या तीन भागांमधून जाणून घेतले. निवडणूक प्रचार तंत्रात वाकबदार असलेल्या माहीतगाराने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख राजकीय पक्षाचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किमान सहा मोटारी व दीड-दोन डझन मोटारसायकली आपल्या प्रचारासाठी विकत घेत असतो. यंदा ज्यांची उमेदवारी नक्की झाली आहे अशा उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला असून बहुसंख्य उमेदवारांची पसंती मारुती इको व मिहद्रा जीप यांना आहे.
माध्यमांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत- एक (वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके) ज्याला ‘प्रिंट मीडिया’ असे म्हटले जाते ते, दुसरे श्राव्य माध्यमे जसे रेडिओ, सेलफोनवर होणारा प्रसार उदाहरणार्थ कॉलर टय़ुन्स व पक्षाकडून आणि उमेदवारांकडून येणारे फोन इत्यादी आणि तिसरे दृक्-श्राव्य माध्यम अर्थात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे. यापकी जनमनावर सर्वात मोठा प्रभाव असलेले माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे ही होत. या माध्यमाच्या वितरणाचे नियंत्रण दूरसंचार नियंत्रक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’कडून केले जाते. ३१ जानेवारी २०१४ रोजी भारतात एकूण ८२३ वाहिन्या असून त्यापकी १८४ वाहिन्या सशुल्क आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अध्यादेशाने देशातील दूरचित्रवाणी क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. ११ नोव्हेंबर २०११ रोजीच्या अध्यादेशाने अॅनालॉग तंत्रज्ञान इतिहासजमा होऊन डिजिटल तंत्रज्ञान उदयास आले. ३१ मार्च २०१५ नंतर देशातील दूरचित्रवाणी यंत्रणा ही डिजिटल तंत्रज्ञानावर चालतील. सर्वप्रथम ३१ ऑक्टोबर २०१२ या तारखेला देशातील चार महानगरांतील अॅनालॉग प्रसारण बंद झाले. यापुढील टप्प्यात ३१ मार्च २०१३ रोजी पटना, नागपूर, पुणे, चंदिगढ आदी शहरांतील अॅनालॉग प्रसारण बंद झाले. तिसऱ्या टप्प्यासाठी ३० सप्टेंबर २०१४ ही कालमर्यादा असून उर्वरित भारतासाठी ३१ डिसेंबर २०१४ ही आहे. भारतात सात डीटीएच सेवा पुरवठादार असून डीडी डिरेक्ट ही सरकारी तर टाटा स्काय, डिश टीव्ही, सन टीव्ही, एअरटेल, बिग टीव्ही, व्हिडीओकॉन डीटीएच हे सहा खासगी सेवा पुरवठादार आहेत. या प्रसारणासाठी डीडी डिरेक्ट इस्रोचे इन्सॅट ४ सीआर व अन्य चार उपग्रह वापरले जातात तर हे खासगी पुरवठादार खासगी उपग्रह प्रसारणासाठी वापरतात. भारतात ३१ डिसेंबर २०१३ रोजी १३५ दशलक्ष ग्राहक डीटीएच सेवेचा लाभ घेत होते. भारतात क्रिकेट वर्ल्ड कप, ऑलिम्पिकप्रमाणे निवडणुकांच्या वेळी जोडण्यांमध्ये मोठी वाढ दिसून येते. म्हणून या क्षेत्रातील दोन मुख्य स्पर्धक अर्थात डीटीएच सेवा पुरवठादार डिश टीव्ही व मल्टी सव्र्हिस ऑपरेटर डेन नेटवर्क्स यांची माहिती करून घेऊ.
डिश टीव्ही इंडिया लि.
‘किंग खान’ शाहरूख सदिच्छादूत असलेली डिश टीव्ही ही कंपनी देशातील प्रमुख डीटीएच सेवा पुरवठादार आहे. ही कंपनी झी समूहाचा एक भाग आहे. डीटीएच सेवा देणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. सध्या आशियातील सर्वात जास्त वर्गणीदार असलेली ही कंपनी डिजिटलायझेशनमुळे जगातील सर्वात जास्त वर्गणीदार असलेली कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. ही कंपनीची सेवा सर्वसाधारण व ‘हाय डेफिनेशन’ या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. कंपनी आपल्या प्रसारणासाठी तीन उपग्रहांचा वापर करत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजनांमधून त्यांच्या सोयीची योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या डिश टीव्हीवर ४०० वाहिन्यांमधून आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याचा व त्यानुसार वर्गणी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
डेन नेटवर्क्स लिमिटेड
डेन नेटवर्क्स लिमिटेड ही आघाडीची मल्टी-सव्र्हिस ऑपरेटर आहे. या कंपनीची स्थापना १० जुल २०११ रोजी झाली. ही कंपनी टीव्ही सिग्नलचे वितरण आपल्या केबल जाळ्यामार्फत करते. ही कंपनी या व्यवसायातील भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. ताज्या आकडेवारीनुसार १९.५९ दशलक्ष सेटटॉप बॉक्सपकी १३.७८ दशलक्ष सेटटॉप बॉक्स (साधारण ७१ टक्के) सेटटॉप बॉक्स डेनचे आहेत. डेनचे केबल ग्राहक भारताच्या १३ संघ राज्य व केंद्रशासित प्रदेशात केबल सेवा घेत आहेत. या राज्यांपकी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ ही प्रमुख राज्ये होत. भारतातील जी राज्ये ‘हेल्दी बेल्ट’ म्हणून ओळखली जातात या ठिकाणी डेनचे ठळक अस्तित्व जाणवते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
डिजिटलायझेशनला निवडणुकीचा मुलामा
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरुद मिळविणारी भारताच्या राज्य व्यवस्थेतील निवडणुकीने अर्थव्यवस्थेवर होणारा बदल चार भागांच्या लेखमालेतून समजून घेत आहोत.
First published on: 24-02-2014 at 07:58 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digitisation and elections