Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८०० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५६,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices in mumbai pune nagpur nashik new rates maharashtra on saturday 20 august 2022 pvp
First published on: 20-08-2022 at 09:24 IST