पूर्वाश्रमीची गुडलास नेरोलॅक पेंट्स आता जपानच्या कन्साई पेंट्सच्या अधिपत्याखाली आल्यापासून कन्साई नेरोलॅक पेंट्स झाली आहे. भारतातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून कंपनी मुख्यत्वे डेकोरेटिव्ह पेंट्स, औद्योगिक रंग, मरीन पेंट्स, इनॅमल, वाíनश, कोटिंग्स, रेजिन्स इ. विविध उत्पादने करते. कानपूर, रत्नागिरी, अहमदाबाद, पेरुंगुडी आणि रेवारी या पाच ठिकाणाहून उत्पादन करणाऱ्या कन्साई नेरोलॅकचे भारतभरात ६६ ठिकाणी विक्री डेपो आहेत.
गेल्या वर्षभरात कंपंनीच्या शेअरच्या भावात ६०% पेक्षा जास्त वाढ झालेली असली तरीही नेरोलॅक मला आकर्षक वाटतो याची काही मुख्य कारणे म्हणजे गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती, वाहन उद्योगाला आलेले चांगले दिवस आणि डेकोरेटिव्ह पेंट्समध्ये कंपनीने केलेली प्रगती. कंपंनीच्या एकूण उत्पन्नापकी ४५% उत्पन्न हे औद्योगिक क्षेत्रापासून असून त्या पकी ७५% उत्पन्न हे वाहन क्षेत्रापासून आहे. जपानी पालक कंपनी कन्साई पेंटचे वाहन क्षेत्रातील प्राबल्य कन्साई नेरोलॅकच्या पथ्यावर पडेल. सध्या ४६ च्यावर पी/ई असलेला हा शेअर थोडा महाग वाटला तरीही अपेक्षित आíथक निष्कर्षांनुसार पुढील वर्षांकरिता हेच गुणोत्तर सध्याच्या किमतीस १६ पडते. वाहन उद्योगाची भरभराट, येऊ घातलेल्या स्मार्ट सिटीज् आणि डेकोरेटिव्ह पेंट्समध्ये घेतलेली भरारी यामुळे जवळपास कर्जमुक्त असलेल्या नेरोलॅकसाठी आगामी काळ चांगलाच असेल. म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (२-३ वर्षांसाठी) हा शेअर आकर्षक वाटतो.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2015 रोजी प्रकाशित
रंग साज..
पूर्वाश्रमीची गुडलास नेरोलॅक पेंट्स आता जपानच्या कन्साई पेंट्सच्या अधिपत्याखाली आल्यापासून कन्साई नेरोलॅक पेंट्स झाली आहे.

First published on: 04-05-2015 at 12:45 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kansai nerolac paints share