नियोजनाअभावी आयुष्य संपण्याआधी बचत संपेल!

जैवविज्ञानात जे बदल घडत आहेत ते पाहाता मानवाची सरासरी आयुर्मर्यादा वाढणार, बहुतांश माणसांनी शतायुषी होणे हे अप्रूप राहणार नाही.

जैवविज्ञानात जे बदल घडत आहेत ते पाहाता मानवाची सरासरी आयुर्मर्यादा वाढणार, बहुतांश माणसांनी शतायुषी होणे हे अप्रूप राहणार नाही. आजची भारताची लोकसंख्येची संरचना पाहिली तर तुमची बचत आयुष्यभरासाठी पुरण्याऐवजी अगोदरच संपेल असा निष्कर्ष तुम्ही काढू शकाल. म्हणूनच जितक्या लवकर शक्य आहे तेथपासून अतिशय काळजीपूर्वक  नियोजन करायला हवे, असे सांगत आहेत डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाचे उपाध्यक्ष व विक्री विभागप्रमुख अजित मेनन..
* केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची आस बांधून उसळलेल्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श करून खाली आले आहेत. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदार वाचकांना तुम्ही काय सल्ला द्याल?
– तुमच्या प्रश्नाचे उत्तर दोन भागात देता येईल. गुंतवणूकदरांचे दोन गट आहेत. पहिल्या गटात ज्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे असे व दुसरा गट  ज्यांना गुंतवणूक करायची होती पण करायची की नाही, नक्की केव्हा करायची हे निश्चित न झाल्यामुळे काही कारणांनी ते गुतंवणूक करू शकले नाहीत असे. ज्यांनी गुंतवणूक आधीच केली आहे व अर्थात ज्यांना त्यावर नफा झाला आहे, त्यांनी जर अपेक्षित लक्ष्य गाठले असेल तर नफा तेवढा काढून घ्यावा व मुद्दल तशीच गुंतवून ठेवावी. जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी पाच वष्रे असेल व दोन अथवा तीन वष्रे झाली असतील तर तरीही गुंतवणूक तशीच फंडात राहू द्यावी. ज्यांना गुंतवणूक करायची होती परंतु नक्की कधी करावी हे न कळल्यामुळे जे गुंतवणूक करू शकले नाहीत त्यांना गुंतवणूक करण्याची अजूनही संधी आहे. सध्या ‘लिक्विड फंड’ देखील ७-७.५ टक्के करपश्चात वार्षकि परतावा देत आहे. म्हणून लिक्विड फंडात गुंतवणूक करावी व ‘एसटीपी’ म्हणजेच ‘सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान’चा अवलंब करून टप्याटप्प्याने आपल्या इच्छित फंडात गुंतवणूक करावी.  
* आज भारतात सेबीकडे नोंदलेल्या ४४ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आहेत. या सर्व मालमत्ता कंपन्यांच्या मिळून सुमारे २००० हून अधिक योजना आहेत. यापकी नक्की कोणत्या  योजनेची निवड करावी या विचाराने गुंतवणूकदार गोंधळून गेले आहेत. काय सुचवाल?
– चांगला प्रश्न विचारलात. निक मरे या नावाचा अमेरिकेत अत्यंत यशस्वी म्युच्युअल फंड विक्रेता आहे. या माणसाने म्युच्युअल फंड विकण्यापेक्षाही गुंतवणूकदारांना साक्षर करण्याचे मोठे काम केले आहे. निक मरे यांच्या मते, kInvestment outcomes is not investment performance; its investor behaviorl (एखादी गुंतवणूक यशस्वी होण्यात गुंतवणुकीच्या परिस्थितीपेक्षा गुंतवणूकदाराच्या वर्तनाचा मोठा वाटा असतो.) तेव्हा गुंतवणूकदाराने आपल्या गरजा ओळखणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमचा एक गुंतवणूक सल्लागार असणे जरूरी आहे. तुमच्याकडे जर कोणी विक्रेता एखादा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा प्रस्ताव घेऊन आला तर सर्वप्रथम त्याला, ‘माझी जोखीम सहन करण्याची पातळी काय?’ असा प्रश्न विचारा. ती गुंतवणूक का फायद्याची आहे ते जाणून घ्या. विक्रेत्याचा अनुभव, शिक्षण जाणून घ्या. जर मला एखादी केस लढवायला उत्तम वकील लागतो. एखादी शास्त्रक्रिया करायला निष्णात शल्य चिकित्सक लागतो, मग उच्च शिक्षित १० ते १२ वर्षांचा अनुभवी गुंतवणूक सल्लागार का नको. आज दुर्दैवाने भारतात कुशल वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आहेत. आम्ही विक्रेत्याचीदेखील वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी करतो. काही विक्रेत्यांचा हाच व्यासाय आहे आणि काहींचा हाही एक व्यावसाय आहे. या दोन गोष्टीत फरक आहे. म्हणून कुठली योजना चांगली आहे याचा अभ्यास करण्यात वेळ घालविण्यापेक्षा चांगला गुंतवणूक सल्लागार निवडण्याकडे लक्ष द्या. जो तुमच्या गरजा व जोखीम सहन करण्याची क्षमता यांचा समतोल साधत तुम्हाला योग्य ठरेल अशा उत्पादनाची शिफारस करेल.
* एका बाजूला बाजारमूल्याने अव्वल १०० कंपन्यात गुंतवणूक करणारी ‘टॉप १००’ तर दुसरीकडे पहिल्या ३०० कंपन्या सोडून इतर कंपन्यांतून निवड करून गुंतवणूक असणाऱ्या योजना आहेत. यातून गुंतवणूकदाराने आपली निवड कशी करावी?
– सर्वप्रथम गुंतवणूकदाराने ‘‘मी कोण’’ याचा शोध घ्यावा. भारतातील बहुसंख्य गुंतवणुकदार हे बचतकत्रे आहेत. संपत्तीचे निर्माते नाहीत. संपतीचे निर्माते वेगळे आणि बचतकत्रे वेगळे. आज डीएसपी ब्लॅकरॉककडे जेव्हा परकीय अर्थसंस्था येतात; भारतात गुंतवण्यासाठी आमचा सल्ला घेतात तेव्हा आम्ही पहिल्यांदा विचारतो ‘तुमची गुंतवणूक किती काळासाठी भारतात रहाणार आहे?’ आणि उत्तर असते १५ ते २० वष्रे. आश्चर्य वाटेल पण येणारा कोणीही पाच ते सात वर्ष म्हणजे अल्पकाळासाठी गुंतवणूक घेऊन येत नाही. आज भारतीयांना पाच वष्रे म्हणजे खूप मोठा काळ वाटतो. आणि यालाच ते गुंतवणूक म्हणतात. म्हणून मी म्हणतो की भारतीय नागरिक हे बचतकत्रे आहेत, आणि संपती कशी निर्मिती करतात ते त्यांना ठाऊक नाही. आज जगात, जैव तंत्रज्ञान क्षेत्रात जे बदल घडत आहेत ते पाहता मानवाची सरासरी आयुर्मर्यादा वाढणार आहे, त्याने शतायुषी होणे हे आता अप्रूप राहणार नाही. दुसरीकडे आज भारतात किरकोळ किमतीवर आधारीत महागाईचा दर सरासरी १०% आहे, तर सरकारी रोख्यांवरील परताव्याचा दर ७.७५%आहे. म्हणजे दरवर्षी २% परतावा असाच कमी होत असतो. परिस्थिती अशी आहे की तुमचे पसे आधी संपतील नंतर तुमचा मृत्यू होईल. म्हणून आज नियोजन अतिशय काळजीपूर्वक करायला हवे. भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर समाधानकारक नाही. परंतु ही संथ गती कायम रहाणार नाही. आता नवीन सरकारही सत्तारूढ झाले आहे. म्हणून पुढील पाच ते सात वर्षांसाठी गुंतवणूक करावी.
*  मग सामान्य गुंतवणूकदारांसाठी सल्ला काय?  
– आधी म्हटल्याप्रमाणे सामान्य गुंतवणूकदाराने स्वत:ला ओळखावे व आपली धोका स्वीकारण्याची तयारी कुठवर आहे हे जाणून घ्यावे. पहिल्या वेळेला गुंतवणूक करणाराने हायब्रिड फंड किंवा बँलन्स फंडापासून सुरुवात करावी. ज्या कोणाला डॉलरमध्ये खर्च आहेत, उदाहणार्थ मुले परदेशात शिकत आहेत. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lack of planning in saving

ताज्या बातम्या