आयडीबीआय डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड हा मल्टीकॅप इक्विटी फंड आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून नफा कमावणे हा या फंडाचा उद्देश आहे. फंडाच्या उद्दिष्टानुसार जास्तीत जास्त १०० टक्के ते किमान ७० टक्के समभाग व समभाग सदृश्य गुंतवणूक करता येते. ज्या कंपन्यांनी अनेक आíथक तसेच वेगवेगळी व्यावसायिक आवर्तने (बिझनेस सायकल्स) अनुभवली आहेत, अशा जुन्याजाणत्या कंपन्यात या फंडाचे निधी व्यवस्थापक गुंतवणूक करतात. थोडक्यात ‘ओल्ड इज गोल्ड’ ही थीम राबविणारा हा फंड आहे. हा फंड पहिल्यांदा मार्च २०१४ मध्ये गुंतवणुकीस खुला झाला. याच सुमारास शेअर बाजारानेही जोर पकडल्यामुळे मागील सहा महिन्याचा परतावा ५५ टक्के आहे. असाच परतावा भविष्यात मिळेल असा फंड व्यवस्थापनाचा दावा नाही. परंतु प्रमुख शेअर निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षा अधिक परतावा हा फंड देईल अशी फंड व्यवस्थापनाला आशा आहे.
हा फंड लार्ज कॅप व मिड कॅप दोन्ही प्रकारच्या समभागात गुंतवणूक करतो. फंड व्यवस्थापन ओल्ड इज गोल्ड हे धोरण राबवत असले तरी डॉमिनोज् ही पिझ्झा विक्री केंद्रांच्या शृंखलेची मालकी असणारी ज्युबिलीयन्ट फूडवर्क्ससारखी नव्या जमान्यातली कंपनीही पोर्टफोलिओत आहे. तसेच हिंदुस्थान युनीलिव्हरसारखी पोर्टफोलिओला स्थिरता देणारी कंपनी पहिल्या १० गुंतवणुकांचा भाग आहे. पोर्टफोलिओतील कंपन्यांची संख्या जास्त असली तरी अति विविधता टाळण्यात निधी व्यवस्थापक बऱ्यापकी यशस्वी झालेला आहे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून भांडवली वृद्धीची अपेक्षा असणाऱ्यांसाठी आदर्श असलेला हा फंड आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2014 रोजी प्रकाशित
जुनं ते सोनं!
आयडीबीआय डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड हा मल्टीकॅप इक्विटी फंड आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून नफा कमावणे हा या फंडाचा उद्देश आहे. फंडाच्या उद्दिष्टानुसार जास्तीत जास्त १०० टक्के ते किमान ७० टक्के समभाग व समभाग सदृश्य गुंतवणूक करता येते.

First published on: 29-09-2014 at 07:53 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old is gold