अमेरिकेतील इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करणाऱ्या टेस्ला या कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत सोमवारी विक्रमी वाढ झाली आहे. हेर्ट्झ ग्लोबल होल्डिंगनं एकाच वेळी तब्बल १ लाख इलेक्ट्रिक कार्सची ऑर्डर दिल्यानंतर टेस्ला यांच्या संपत्तीचे आकडे थेट गगनाला भिडले. या व्यवहारानंतर टेस्ला शेअर्सचा भाव तब्बल १४.९ टक्क्यांनी म्हणजेच १ हजार ४५ डॉलर्सनी वधारला आहे,. त्यामुळे टेस्ला कंपनीतील एलन मस्क यांच्या २३ टक्के शेअर्सची किंमत आता थेट २८९ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे! एलन मस्क यांनी टेस्ला कंपनीचा तीन ट्रिलियन बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यावर ट्वीट देखील केलं आहे.

३६ अब्ज डॉलर्सने वाढली संपत्ती!

आत्तापर्यंतच्या इतिहासात एकाच दिवशी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मस्क यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही एका दिवसातली सर्वाधिक वाढ ठरली आहे. मस्क यांच्या संपत्तीमध्ये फक्त सोमवारच्या एका दिवसात तब्बल ३६ अब्ज डॉलर्सची अर्थात २ लाख ७१ हजार कोटींची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

एलॉन मस्क यांचा गुगल, फेसबुकवर निशाणा; म्हणाले, “या बड्या टेक कंपन्यांमध्ये तरुणांची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्क यांची एकूण संपत्ती २८८.६ अब्ज डॉलर्स!

२०२१ या वर्षाचा विचार करता या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये ११९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एलन मस्क हे टेस्लाच्या सीईओ पदासोबतच रॉकेट उत्पादक कंपनी असलेल्या स्पेस एक्सचे देखील सीईओ आणि भागधारक आहेत. ऑक्टोबर महिन्यातील बाजारभावानुसार या कंपनीची किंमत आता १०० अब्ज डॉलर्सच्या घरात गेली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून मस्क यांची एकूण वैयक्तिक संपत्ती आता २८८.६ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड झाली आहे. त्यांच्या एकट्याची ही संपत्ती आता एक्सॉन मोबाईल कॉर्पोरेशन किंवा नायके या मोठ्या ब्रँड्सपेक्षाही जास्त झाली आहे.