1. मेष:-खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधी चालून येईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
  2. वृषभ:-धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.
  3. मिथुन:-उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.
  4. कर्क:-जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्‍यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.
  5. सिंह:-योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
  6. कन्या:-धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघांत कौतुक केले जाईल.
  7. तूळ:-भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. लॉटरी सारख्या व्यवहारातून फायदा संभवतो. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.
  8. वृश्चिक:-अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.
  9. धनू:-घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.
  10. मकर:-लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
  11. कुंभ:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
  12. मीन:-छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?