News Flash

आजचं राशीभविष्य, सोमवार, १८ जानेवारी २०२१

सर्व राशींचे भविष्य

  1. मेष : धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कर्तृत्वाने मान मिळवाल. उपासनेला बळ मिळेल. गुरुकृपेचा लाभ होईल. सरकारी कामात वेळ जाईल.
  2. वृषभ : चांगला आर्थिक लाभ होईल. काटकसरीने वागाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. कर्जप्रकरणे तूर्तास टाळावीत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.
  3. मिथुन : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाने भारावून जाल. इतरांचे कौतुक करण्याचे विसरू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. चंचलतेवर मात. करावी.
  4. कर्क : नातेवाईकांची मदत होईल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. भावनांना मुरड घालावी. मुलांच्या स्वछंदीपणाकडे लक्ष ठेवा.
  5. सिंह : विलंबावर मात करा. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. शैक्षणिक गरज भागेल. बक्षिसास पात्र व्हाल. अचानक धनलाभ संभवतो.
  6. कन्या : उत्तम वाहन सौख्य लाभेल. नातेवाईकांचा सहवास मिळेल. मानसिक शांतता राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीत सलोखा वाढेल.
  7. तूळ : वाचनाची आवड पूर्ण होईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. आशावादी दृष्टीकोन ठेवाल. तात्विक वादात अडकू नका. हातातील अधिकार योग्य प्रकारे वापरा.
  8. वृश्चिक : सांपत्तिक स्थैर्य लाभेल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ होईल. तुमची कमाई वाढेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
  9. धनू : आशावादी दृष्टीकोन ठेवाल. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. व्यवसायात प्रगती करता येईल. स्वत:चा मान राखाल. तर्कनिष्ठ बुद्धी वापराल.
  10. मकर : शांततेने विचार कराल. दान-धर्माचे महत्व समजावून द्याल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. काही कामांत क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल.
  11. कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रांतील व्यक्तींची गाठ पडेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ घेता येईल. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. आर्थिक गरज पूर्ण होईल.
  12. मीन : व्यावसायिक चिंता मिटेल. हातात विशेष अधिकार येतील. वडिलांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. घरातून उत्तम सहकार्य लाभेल.

    — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope monday 18 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, रविवार, १७ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, शनिवार, १६ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १५ जानेवारी २०२१
Just Now!
X