News Flash

आजचं राशीभविष्य, शनिवार, २२ मे २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:- उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.
  2. वृषभ:- सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.
  3. मिथुन:- लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.
  4. कर्क:- जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल.
  5. सिंह:- गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.
  6. कन्या:- दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्‍या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी.
  7. तूळ:- मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो..
  8. वृश्चिक:- कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका.
  9. धनू:- कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
  10. मकर:- भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्‍या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्‍यांची साथ मिळेल.
  11. कुंभ:- उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.
  12. मीन:- खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope saturday 22 may msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २१ मे २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरूवार, २० मे २०२१
3 आजचं राशीभविष्य, बुधवार, १९ मे २०२१
Just Now!
X