News Flash

आजचं राशीभविष्य, रविवार, १८ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:- मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.
  2. वृषभ:- फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडीनिवडी वर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.
  3. मिथुन:- चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
  4. कर्क:- भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  5. सिंह:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
  6. कन्या:- भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
  7. तूळ:- घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
  8. वृश्चिक:- तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
  9. धनू:- हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.
  10. मकर:- नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
  11. कुंभ:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
  12. मीन:- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope sunday 18 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शनिवार, १७ एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १६ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, गुरूवार, १५ एप्रिल २०२१
Just Now!
X