1. मेष:-मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा  योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील.
  2. वृषभ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
  3. मिथुन:-भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.
  4. कर्क:-कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
  5. सिंह:-दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून  मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल.
  6. कन्या:-काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.
  7. तूळ:-जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील. जुगाराची आवड पूर्ण कराल.
  8. वृश्चिक:-हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल  अडचणीतून  मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा.
  9. धनू:-आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.
  10. मकर:-हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.
  11. कुंभ:-गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.
  12. मीन:-जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातून समाधान मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?