02 March 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, बुधवार, २० जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष : कामे यथायोग्य पार पडतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी येणी वसूल होतील. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
  2. वृषभ : जोडीदाराचे वर्चस्व राहील. किरकोळ मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. अतिविचार करणे टाळावे. उगाचच दुराग्रह करू नका.
  3. मिथुन : वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. मनातील गैरसमज दूर करावेत. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
  4. कर्क : कामाची धांदल राहील. घाईने कोणत्याही गोष्टी उरकू नका. मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराची कमाई वाढेल.
  5. सिंह : कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. जमिनीची कामे तूर्तास करू नयेत. तब्येतीत काहीसा फरक पडेल. क्षुल्लक कारणावरून दुरावा वाढवू नका. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
  6. कन्या : प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत विरोधी वाटू शकते. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
  7. तूळ : बोलतांना भान राखावे. अनावश्यक खर्च वाढेल. प्रवासात काहीसा त्रास जाणवेल. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.
  8. वृश्चिक : क्रोधावर नियंत्रण ठेवावे. पित्त-विकार बळावू शकतात. किरकोळ अडचणीतून मार्ग काढा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या धाडसात वाढ होईल.
  9. धनू : जुगाराची हौस पूर्ण करता येईल. जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवावी. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामाजिक वादात अडकू नका. सामाजिक बांधीलकी जपावी.
  10. मकर : कामातील दिरंगाई टाळावी. खर्चाचा पुनर्विचार करावा. अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. बोलण्यात लाघवीपणा ठेवाल.
  11. कुंभ : सर्वांशी हसून खेळून वागाल. दिवस आळसात घालवाल. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. झोपेची तक्रार जाणवेल.
  12. मीन : अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. बढतीसाठी प्रयत्न करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कुटुंबात कर्तेपणाचा मान राहील. मुलांवरील खर्च वाढेल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 12:41 am

Web Title: daily astrology horoscope wednesday 20 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १९ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, सोमवार, १८ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, रविवार, १७ जानेवारी २०२१
Just Now!
X