मेष

कुलस्वामिनीच्या मंदिरात पांढरी फुले, गजरा अर्पण करावी. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग –जांभळा

24th April Panchang Marathi Horoscop
२४ एप्रिल पंचांग: उत्तम आर्थिक लाभ ते कौटुंबिक सौख्य, आज १२ पैकी ‘या’ राशींचे नशीब उजळवणारा माता लक्ष्मी
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

वृषभ

लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणावे. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –निळा

सिंह

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील
आजचा रंग -जांभळा

कन्या

ॐ श्री नमः या मंत्राचा जप करावा. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग –नारंगी

तुळ

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

धनु

गणपती अथर्व शीर्षकाचे पाठ करावेत. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग –आकाशी

मकर

गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करावे. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

गणपती मंदिरामध्ये लाल आणि तांबडी फुले अर्पण करावी. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग- पांढरा

मीन

कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरूवात करावी. आज 12.53 नंतर चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu