13 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. मानसिक चांचल्य जाणवेल. चित्त एकाग्र करावे. विविध विषयांमध्ये रुची दाखवाल.
 • वृषभ:-
  घरगुती कामात अडकून पडाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. व्यापारी वर्ग खुश राहील. हौसेला महत्त्व द्याल.
 • मिथुन:-
  एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. मुलांच्या कारवायांवर लक्ष द्यावे. कामात घाई करू चालणार नाही. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
 • कर्क:-
  भावनेच्या आहारी जाऊ नका. अतिविचार करत बसू नका. उधारीची कामे करू नका. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. घराची कामे काही काळासाठी पुढे ढकलावीत.
 • सिंह:-
  फसव्या लोकांपासून दूर राहावे. इच्छा पूर्ण करण्यासाठी अडून बसू नका. जवळच्या प्रवासात संपूर्ण सतर्कता ठेवावी. अधिकाराचा यथायोग्य वापर करावा. मुलांचा चंचलपणा समजून घ्यावा.
 • कन्या:-
  घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. कामाची धांदल उडेल. कामात एकसूत्रता ठेवावी.
 • तूळ:-
  व्यवसायात प्रगती करता येईल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कामात हातभार लावाल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. सामाजिक वजन वाढेल.
 • वृश्चिक:-
  काही गोष्टींची कमतरता जाणवेल. संयम बाळगावा लागेल. सैरभैर होण्याची गरज नाही. योग्य वेळेची वाट पाहावी. ध्यानधारणा करावी लागेल.
 • धनु:-
  जोडीदाराविषयी चटकन मत बनवू नये. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. वैवाहिक सौख्यकडे लक्ष द्यावे. प्रगल्भ विचार मांडाल. अकारण चिंता करत बसू नका.
 • मकर:-
  गैरसमजातून वितुष्ट निर्माण होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कफाचा त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता जाणवेल. कामाच्या ठिकाणी घाई करू नका.
 • कुंभ:-
  मुलांशी मतभेद संभवतात. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. करमणूक प्रधान गोष्टींकडे लक्ष राहील. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.
 • मीन:-
  घरातील वातावरण हसते-खेळते असेल. एकाचवेळी कामाची गडबड उडेल. बागकामाची आवड पूर्ण कराल. घाईगडबडीत कामे उरकू नका. जोडीदाराला समजून घ्या.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 12:04 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 13 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १२ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० डिसेंबर २०१९
Just Now!
X