मेष:-जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.

वृषभ:-विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.

मिथुन:-हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.

कर्क:-लोकांना नवे ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.

सिंह:-कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.

कन्या:-घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

तूळ:-मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.

वृश्चिक:-जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.

धनू:-सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.

मकर:-आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.

कुंभ:-अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.

मीन:-व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर