22 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २४ जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-
  वडिलांचा विरोध जाणवेल. न्यायीपणाने वागाल. शासकिय कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणा दर्शवाल. नवीन विचारांची कास धरावी.
 2. वृषभ:-
  जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वारसा हक्काची कामे पुढे सरकतील. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
 3. मिथुन:-
  काही गोष्टी दिरंगाईने होतील. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. शांतपणे विचार करावा.
 4. कर्क:-
  गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कष्टाला पर्याय नाही. काही गोष्टी दिरंगाईने होतील. वात-विकार बळावू शकतात. आपली संगत तपासून पहावी.
 5. सिंह:-
  बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. चिकाटीने कामे कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. राजकारणी लोकांना फायदा होईल. ज्ञानात भर पडेल.
 6. कन्या:-
  घरातील ज्येष्ठांशी जुळवून घ्यावे. दिवस घरकामांत निघून जाईल. भावंडांची बाजू विचारात घ्या. मुलांचे प्रश्न सामोरे येतील. मानसिक स्वास्थ्य जपावे.
 7. तुळ:-
  चिंतनातूनच योगी मार्ग काढावा. सर्व बाजूंचा सखोल विचार कराल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्व-कर्तृत्वावर भर द्याल. चट्कन निराश होऊ नका.
 8. वृश्चिक:-
  स्थावरच्या कामांत गती येईल. चिकाटीने कामे कराल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. कमीत-कमी शब्दांत मत मांडा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा.
 9. धनू:-
  पायाचा त्रास जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. मनातील चिंता बाजूला सारावी. ध्यानधारणा करावी.
 10. मकर:-
  चांगला व्यावसायिक लाभ होईल. काही कलागुण दिसायला वेळ द्यावा. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील. फार चिंता करत बसू नका.
 11. कुंभ:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. महिला आपली हौस पूर्ण करतील. नवीन गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.
 12. मीन:-
  कामात एकसूत्रता ठेवावी. फार चंचलपणे वागू नका. गप्पा मारण्यात वेळ घालवाल. आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांशी मैत्री कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on January 24, 2020 1:01 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 24 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २१ जानेवारी २०२०