25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २६ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  सहज मिळणाऱ्या गोष्टींनी हुरळून जावू नये. भावंडांचे सहकार्य मिळेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास कराल.
 • वृषभ:-
  संयमाची जोड घ्यावी लागेल. फार काळ विचार करत बसू नका. आपल्या मतावर ठाम राहाल. घरातील कामे आवडीने पार पाडाल. किरकोळ खरेदीत वेळ घालवाल.
 • मिथुन:-
  एकावेळी अनेक कामे हातात घेवू नयेत. आपले वेगळेपण सिध्द करावे. ठाम निर्णय घ्यावेत. कामाचा आवाका लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे.
 • कर्क:-
  आवक-जावक यांची उजळणी करावी. गोड बोलण्यावर भर द्यावा लागेल. जबाबदाराची जाणीव ठेवाल. तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्च वाढू शकतो.
 • सिंह:-
  उत्साहाला आवर घालावी लागेल. कामामुळे थकवा जाणवेल. फार ताण घेवू नका. वेळ आणि काम यांची योग्य सांगड घालावी लागेल. दिरंगाई टाळावी.
 • कन्या:-
  उघडपणे बोलणे टाळावे. जनविरोधापासून दूर राहावे. सामाजिक बाजू लक्षात घ्यावी. अपेक्षित लाभाचा आनंद घ्याल. झोपेची तक्रार दूर करावी.
 • तुळ:-
  अधिकारी व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यावसायिक लाभाचा दिवस. नम्रपणे वागावे. दृष्टीकोन बदलून पाहावा.
 • वृश्चिक:-
  कामातील बदल जाणून घ्यावा. कार्यप्रविणता वाढीस लागेल. अतिउत्साह टाळावा. अचानक धनलाभाची शक्यता. सारासार विचारला प्राधान्य द्यावे.
 • धनु:-
  चुकीचे विचार मनातून काढून टाका. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. कामातून आनंद शोधावा. गैरसमजुतीत अडकू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
 • मकर:-
  गप्पांमध्ये रमून जाल. जोडीदाराच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक कराल. मुलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. पोटाची तक्रार जाणवू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
 • कुंभ:-
  बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. उष्णतेचे विकार जाणवतील. अकारण चीड-चीड करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.
 • मीन:-
  काही कामे रेंगाळतील. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व गाजवाल. आपलेच म्हणणे खरे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाची द्विधावस्था टाळावी.


  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on August 26, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 26 august 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २५ ऑगस्ट २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ ऑगस्ट २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २३ ऑगस्ट २०१९
Just Now!
X