05 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-रेस जुगारातून लाभ संभवतो. नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.
  • वृषभ:-कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
  • मिथुन:-जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका.
  • कर्क:-कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वातावरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.
  • सिंह:-तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.
  • कन्या:-अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.
  • तूळ:-कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.
  • वृश्चिक:-पैशांची उधळपट्टी टाळावी. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधि सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.
  • धनू:-क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.
  • मकर:-शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.
  • कुंभ:-बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.
  • मीन:-कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 9th march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ८ मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ७ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ६ मार्च २०२०
Just Now!
X