News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कफ विकार जाणवतील. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मुलांच्या काही समस्या समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. योग्य अनुमान काढू शकाल.
 • वृषभ:-
  तुमच्यातील सुशिक्षितपणा दिसून येईल. चर्चेतून मार्ग काढता येईल. व्यापारात चांगली प्रगती करता येईल. जोडीदाराची व्यावहारिक कुशलता दिसून येईल. बौद्धीक ताण जाणवू शकतो.
 • मिथुन:-
  नसती भांडणे उकरुन काढली जातील. इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. लबाड माणसांपासून दूर राहावे. चुकीच्या धोरणामुळे त्रास होऊ शकेल.
 • कर्क:-
  तुमच्या आकलनाचा कस लागू शकेल. फसवणुकीपासून सावध राहावे. योग्य माहिती शिवाय पुढे जाऊ नका. वरिष्ठांना खुश कारावे लागेल. एकाच गोष्टीसाठी अडून राहू नका.
 • सिंह:-
  संभाषणाची आवड पूर्ण कराल. गप्पागोष्टी करण्यात वेळ जाईल. काही कामे अकारण अडकून पडतील. कौटुंबिक अडचण समजून घ्यावी. मित्रांचा फड जमवाल.
 • कन्या:-
  योग्य तर्क वापरावा. सर्व गोष्टी चौकसपणे जाणून घ्याल. कामाचा वेग सुधारावा. प्रकाशकांना प्रसिद्धी मिळेल. साहित्याची आवड जोपासाल.
 • तूळ:-
  कौटुंबिक खर्च वाढू शकतो. जमा शिल्लक वापरावी लागेल. व्यवहारी बुद्धिमत्तेचा कस लागू शकेल. सर्व गोष्टींचा समतोल राखाल. विनोद करत कामे करून घ्याल.
 • वृश्चिक:-
  अभ्यासूपणे सर्व बाबी जाणून घ्याव्यात. आपल्या भावना नीट समजून सांगाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. कामात तत्परता दाखवाल. तुमचा तर्क बरोबर येईल.
 • धनु:-
  कसलीही लबाडी करण्याचा विचार करू नका. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. जामिनकीच्या व्यवहारात शक्यतो अडकू नका. प्रवासाची आवड पूर्ण होईल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल.
 • मकर:-
  मोठ्या व्यक्तींशी मैत्री करता येईल. लहान मुलांच्यात रमून जाल. अधिकारी वर्गाची चांगली साथ लाभेल. घरी मोठ्या लोकांची उठबस राहील. अभ्यासू व्यक्तींचा सहवास लाभेल.
 • कुंभ:-
  व्यावहारिक चातुर्य दाखवाल. तुमच्यातील हरहुन्नरीपणाची साक्ष पटेल. व्यापारात चांगला फायदा होईल. धंद्याचे योग्य ज्ञान मिळवाल. योग्य अंदाज बांधता येतील.
 • मीन:-
  तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक छंद जोपासता येतील. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. धोरणीपणाने वागाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 07 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ डिसेंबर २०१९
Just Now!
X