25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कर्मठपणे आपले विचार मांडाल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. जुन्या गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीतून योग्य मार्ग काढाल. बौद्धिक प्रगल्भता दाखवाल.
 • वृषभ:-
  जुन्या दुखाण्यांकडे लक्ष द्यावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. चुकीच्या संगतीत अडकू नका.
 • मिथुन:-
  कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. वातविकार त्रास देवू शकतात. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचे विचार जाणून घ्यावेत. आधुनिक विचार करुन पाहावा.
 • कर्क:-
  छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. सामोपचाराचे धोरण ठेवावे. इतरांमुळे मन:स्ताप वाढू शकतो. सर्दी, खोकला यांसारचे त्रास जाणवू शकतात.
 • सिंह:-
  मनाचा होणारा गोंधळ टाळावा लागेल. ठामपणे निर्णय घ्यावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. चिकाटीने कामे कराल. न्यायी विचार मांडाल.
 • कन्या:-
  घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. पुराणमतवादीपणा दूर करावा लागेल. कामातील चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. कष्ट अधिक जाणवतील.
 • तूळ:-
  कामाचा विस्तार वाढविता येईल. एक एक करत खर्च वाढू शकतो. कामाची धावपळ वाढू शकते. नातलगांना मदत कराल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.
 • वृश्चिक:-
  तुमचे नियोजन योग्य ठरेल. केलेल्या कामाचे चीज होईल. विविध लाभ संभवतात. कामे ठरवल्याप्रमाणे पार पाडण्यावर लक्ष द्यावे. कलेला प्रोत्साहन मिळेल.
 • धनु:-
  कामात कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. चिकाटी सोडू नये, प्रौढपणे आपले मत मांडाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील.
 • मकर:-
  योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही गोष्टींपासून दूर जावेसे वाटू शकते. विलंबाने निराश होवू नका. वातावरणाशी समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. चोरांपासून सावध राहावे.
 • कुंभ:-
  मित्रमंडळींमध्ये वेळ घालवावा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. एकांगीपणा दूर करावा. कष्ट करायला मागेपुढे पाहणार नाही. फार विचार करु नये.
 • मीन:-
  हटवादीपणा करु नये. चुकीच्या कल्पना मनात बाळगू नका. व्यवहारचातुर्य दाखवाल. धार्मिक कामात यश येईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 7, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 07 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ सप्टेंबर २०१९
Just Now!
X