• मेष:-
    गैरसमज फार ताणू नयेत. लहानांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. काही गोष्टींना विरोध होवू शकतो. उत्साहाच्या भरात सारासार विचाराला बाजूस सारु नये. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.
  • वृषभ:-
    स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे. काही वेळेस शांत राहणे उत्तम ठरेल. कौटुंबिक शांततेला महत्व द्यावे. काही गोष्टींची ओढाताण जाणवेल.
  • मिथुन:-
    पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांची मदत घ्याल. वादात अडकू नये. साहसाने कामे हाती घ्याल. प्रवासात काळजी घ्यावी.
  • कर्क:-
    कामातून चांगली प्राप्ती होईल. काही कामात अधिक कष्ट पडतील. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. कौटुंबिक प्रश्न भेडसावतील. खर्चाचे योग्य नियोजन कराल.
  • सिंह:-
    मानसिक स्थैर्य जपावे. चिडचिड टाळावी लागेल. पित्त विकार जाणवतील. व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. श्रमामुळे थकवा जाणवेल.
  • कन्या:-
    जनक्षोभापासून दूर राहावे. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. स्त्रीवर्गापासून दूर राहावे. चुकीच्या कामात हात घालू नये. वाद-विवादापासून लांब रहा.
  • तुळ:-
    नवीन मित्र जोडाल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन गोष्टी शिकून घ्या. ओळखीचा सुयोग्य फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील.
  • वृश्चिक:-
    कामाच्यावेळी इतर विचार बाजूला सारावेत. कलेतून आर्थिक फायदा संभवतो. धार्मिक कामात मदत कराल. कामातील बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे. दगदग जाणवेल.
  • धनु:-
    वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. प्रवासात सतर्क राहावे. मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेवू नयेत. वडीलधा-यांचा मान राखावा. मदतीला धावून जाल.
  • मकर:-
    सद्य स्थितीचा विचार करावा. तब्येतीची हेळसांड करू नका. तुमच्यातील समजूतदारपणा दाखवावा. क्षुल्लक गोष्टींवर अडून राहू नका. चिंता करत बसू नये.
  • कुंभ:-
    भागीदारीत प्रगतीला वाव आहे. तुमचा जनसंपर्क वाढीस लागेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
  • मीन:-
    आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची मदत मिळेल. फसवणुकीपासून सावध रहावे. हाताखालील कामगारांवर लक्ष ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर